पुन्हा एका भाजपच्या बलात्कारी साधूला अटक होणार की नाही…?
Max Woman | 18 Sept 2019 12:55 PM IST
X
X
उत्तर भारत शाहजहाँपुर येथे भाजप पूर्व राज्यमंत्री स्वामी चिनमयानंद या साधुने, एका गरीब घरातील मुलीला, राहण्याच्या व नोकरीच्या आमिष दाखवून सतत तिचे शोषण केले.
पीडित मुलगी कायदे शास्त्राची विद्यार्थिनी असून शिकण्यासाठी शहराच्या ठिकाणी गेली असता, चिन्मयानंद याने तिला नोकरी आणि हॉस्टेल रूम ची राहण्याची सोय केली. परंतू रूम च्या बाथरूम मध्ये कॅमेरा बसवून या साधूने त्या विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओच्या ब्लॅकमेलिंग वरती तो तिचे शोषण करू लागला. असे ती म्हणाली व कुणाला सांगितल्यास तिच्या घरच्या व्यक्तींना आणि तिला जीवे मारण्याची धमकी ही दिली.
ती विद्यार्थिनी त्याच्या त्रासाला कंटाळून तिच्या मित्रानं सोबत त्याच भांड फोडण्याचा संकल्प करते, तिच्या धाडशी वृत्तीने आणि सूज बूज नुसार ती, स्वतःच्या चष्म्यामध्ये कॅमेरा बसवून ढोंगी साधूचा पर्दाफाश करते. गेल्या सात ते आठ तासांपासून एस आय टी त्याची चौकशी करत असून त्याच्या आश्रमाला पूर्ण पणे पोलिसांनी सीज केलेलं आहे.
तरीही अजून चिन्मयानंद वरती कोणतीही कार्यवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. आता त्या मुलीला न्याय मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Updated : 18 Sept 2019 12:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire