Home > Max Woman Blog > 'बाई'पणाचं कार्ड!

'बाई'पणाचं कार्ड!

बाईपणाचं कार्ड!
X

एखाद्या व्यक्तीने चुकीची सामाजिक वा राजकीय भूमिका घेतली आहे, असे वाटल्याने कोणी त्या व्यक्तीला विरोध करणे अथवा उपहास करणे किंवा टीका करणे यात 'लिंग' कुठून येते?

ती व्यक्ती अपघाताने महिला असेल, तर 'महिलेचा अपमान झालाय', असा डांगोरा अशावेळी का पिटला जातो?

कंगना एकटीच नाही, इथेही, सोशल मीडियावर काही महिला आहेत. त्यातील काही माझ्या समविचारी आहेत. त्या धैर्याने (काही वेळा अनावश्यक धीटपणाने!) राजकीय भूमिका मांडतात. पण, विरोधकांनी त्यांना बिनडोक वगैरे म्हटले किंवा आक्रमकपणे झापले की 'महिला' कार्ड काढतात. मतमतांतरे वेगळी, पण संविधानिक पद्धतीने परस्परांवर टीका होणे स्वाभाविकच आहे. एकदा, तुम्ही वादविवादाच्या आखाड्यात उतरल्यावर, ते गृहीत आहे.

केवळ महिला म्हणून वाह्यात टीका होत असेल, तर त्याला तीव्र विरोध आहेच. अशी भयंकर, असह्य टीका सोनियांच्या वाट्याला आली. अगदी अमृता फडणवीसांना देखील ती काही प्रमाणात सोसावी लागली. 'सेक्सिस्ट' कमेंट्सचा निषेधच.

(अशा प्रकारच्या कमेंट्स पुरूष- पुरूषांशी अथवा स्त्रिया- स्त्रियांशी बोलतानाही केल्या जाऊ शकतात.)

बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना, कमलादेवी हॅरिस या ॲटर्नी जनरल होत्या. तेव्हा, "कमला म्हणजे अमेरिकेतील सगळ्यात देखणी ॲटर्नी जनरल आहे", अशी केलेली कमेंटही ओबामांना अडचणीची ठरली होती.

अशी विधाने टाळायला हवीतही.

पण, खुल्या संवादात- वाद-विवादात सामान्य टीका झाल्यानंतर 'महिला' कार्ड काढायचे, हे काही मला मान्य नाही.

उलट 'स्त्रीदाक्षिण्या'सारखी ती पुरूषसत्ताक व्यवस्थाशरण अपेक्षा आहे!

तुमचं काय मत आहे?

Updated : 17 Sep 2020 6:26 AM GMT
Next Story
Share it
Top