शपथविधी इतकीच तत्परता दुष्काळ व शेतक-यांच्या प्रश्नावर का दाखवली नाही ?
Max Woman | 23 Nov 2019 4:55 PM IST
X
X
गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येणार, असं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे राजकीय घटनांना वेग आला. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांमध्ये लिहिली जाईल असं काँग्रेस नेते अहमद पटेल म्हटले अनेक राजकीय नेत्यांनी या सर्व प्रकाराचा निषेध केला. त्याचबरोबर फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी आपली परखड मतं आणि भूमिका मॅक्सवुमन जवळ बोलताना व्यक्त केली राज्यपालांच्या या सर्व घटनांवर संशय व्यक्त केला,राज्यपालांची ही भूमिका आमच्यासाठी नवखी आहे, आम्ही पुढे संघ आणि भाजप विरुद्ध लढा देईन, शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे ती योग्य आहे. आम्ही सर्व भाजपविरोधी राहू,त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांचे देखील प्रश्न मांडले, जे भाजप नेते अजित पवारांच्या विरोधात बोलत होते तेच आता अजित पवारांना भेटत आहेत, आमच्यासाठी तत्व महत्वाचे आहेत, सत्तेपेक्षा आम्ही आमच्या विचारधारेशी ठाम आहोत अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.
https://youtu.be/H15H6fJpdJE
Updated : 23 Nov 2019 4:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire