Latest News
Home > रिपोर्ट > चर्चेतील 'सिलेंडर मॅन' आहे तरी कोण?

चर्चेतील 'सिलेंडर मॅन' आहे तरी कोण?

चर्चेतील सिलेंडर मॅन आहे तरी कोण?
X

एखाद्या चित्रपटात किंवा वेबसीरीज मध्ये भूमिका बजावणाऱ्यां कलाकारासारखा दिसणारा हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुणी त्याचा हॉलिवूडचा हिरो तर कुणी सिलेंडरमॅन म्हणून उल्लेख करतोय, बॉडी बिल्डर असलेल्या या तरुणाच्या फोटोने फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. पण मुळात हा तरुण आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर चला या तरुणाची ओळख करून घेऊ या.

अंबरनाथ येथील राणू गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सागर जाधव या तरुणाचा हा फोटो आहे. गॅस एजन्सीमधून गॅस लोकांना घरपोच देण्याचं काम सागर करतो, पण याच बरोबर त्याला जिमची आवड असल्याने तो रोज न चुकता जिमला जात असतो.

नेहमीप्रमाणे तो गॅसची गाडी भरून उभा असताना त्याचा कुणीतरी फोटो काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ऍक्शन मोडमध्ये काढलेला हा फोटो काही तासात व्हायरल झाला. फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल झालेला फोटो इंस्टाग्रामवर सुद्धा चर्चेचा विषय बनला.

max टीमसोबत बोलताना सागर म्हणाला की, माझा फोटो काढल्याच मलाही कळाले नव्हते. मात्र मला अनेक मित्रांचे फोन आले अमी त्यानंतर मी सोशल मिडिया चेक केल्यावर खरच फोटो व्हायरल झाल्याचं कळाले.

कुटुंबातील लोकांना सुद्धा फोटो व्हायरल झाल्याचं कळाले आणि याचं त्यांना खूप आनंद झाला. सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाल्याचं पाहून त्यानाही कौतुक वाटलं, असं सागर म्हणाला. सागर आणखी काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा....

Updated : 28 Jun 2021 1:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top