Home > रिपोर्ट > शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त लिहिणारी पायल रोहतगी आहे तरी कोण?

शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त लिहिणारी पायल रोहतगी आहे तरी कोण?

शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त लिहिणारी पायल रोहतगी आहे तरी कोण?
X

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे पायल रोहतगी सतत चर्चेत असते. भारतातील राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर तिनं याआधीही अशी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.

पायल रोहतगी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. पायल मूळची तेलंगणाची आहे. हैद्राबादमध्ये तिचा जन्म झाला. मॉडेलिंगपासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. २००२ मध्ये आलेल्या 'ये क्या हो रहा हैं' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटांसोबत तिनं छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही काम केलंय. रिऍलिटी शो बिगबॉसमध्येही तिने सहभाग घेतला होता.

काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1135349194472841216

याशिवाय पायलने समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1134834382273994752

Updated : 4 Jun 2019 12:36 PM GMT
Next Story
Share it
Top