महात्मा गांधींवर ट्विट करुन वाद ओढावून घेणाऱ्या निधी चौधरी आहेत कोण?
Max Woman | 2 Jun 2019 9:49 AM GMT
X
X
निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलंय. आएएस अधिकारी होण्याआधी त्यांनी 2008 मध्ये रिझर्व्ह बँकेतही काम केलंय.
त्या मूळचा राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यातल्या डीडवानाच्या रहीवाशी आहेत. जयपूर इथं त्यांचं उच्च शिक्षण झालं. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन या विषयात पी. एचडी संपादन केलीय.
याआधी एप्रिल 2017 मध्ये त्या चर्चेत आल्या होत्या. पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना एका आंदोलना दरम्यान आंदोलकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप निधी यांनी केला होता. त्यानंतर माजी आमदारासह 17 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही निधी यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या होत्या.
Updated : 2 Jun 2019 9:49 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire