Home > रिपोर्ट > कोण आहेत चारुलता टोकस ?

कोण आहेत चारुलता टोकस ?

कोण आहेत चारुलता टोकस ?
X

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या आहेत चारूलता टोकस. चारूलता या कुणबी समाजाच्या आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात कुणबी समाजाचं मतदान निर्णयाक आहे, त्यामुळं चारूलता यांना मोठ्या प्रमाणावर मतदान मिळण्याची अपेक्षा आहे. चारूलता या दिल्लीत स्थायिक आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबियांचं घर आणि शेती वर्ध्यातही आहे. प्रभा राव यांच्या सुपुत्री म्हणून त्यांची राजकारणात एक वेगळीच ओळख आहे. त्यांनी 1990 साली वर्ध्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदही सांभाळलेलं आहे. 5 ते 7 वर्षं त्या महिला काँग्रेस सचिव देखील होत्या. या शिवाय महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलेलं आहे. काँग्रेसने त्यांना 2019 च्या निवडणूकांसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे.

Updated : 1 April 2019 12:41 PM GMT
Next Story
Share it
Top