Home > रिपोर्ट > धक्कादायक, जेव्हा ‘ती’ नवऱ्याची एटीएम मशीन बनते....

धक्कादायक, जेव्हा ‘ती’ नवऱ्याची एटीएम मशीन बनते....

धक्कादायक, जेव्हा ‘ती’ नवऱ्याची एटीएम मशीन बनते....
X

अचानक मला रात्री 1:12 ला एक फोन आला ताई मला तुमची मदत पाहिजे. फोनवर बोलणारी बाई खूप घाबरली होती हे तिच्या आवाजावरून समजत होते. मी त्यांना बोलली की ताई इतक्या रात्री तर मी काही करू शकत नाही पण उद्या सकाळी मी तुम्हाला भेटायला नक्की येते ताई बोलल्या नक्की या त्यांना मी विचारणार तितक्यात त्यांचा फोन कट झाला मी त्या नंबरवर परत फोन केला परंतु फोन बंद लागला.

कोण असणार ती बाई..? तिला माझ्याकडून काय मदत पाहिजे...? कोणत्या प्रॉब्लेममध्ये असेल ती..? असे 100 विचार मनात येत होते! ते विचार करता करता कशी-बशी झोप लागली सकाळी उठल्यावर त्या नंबर वर मी फोन केला नंबर बंद येत होता. मग मला वाटले की कोणत्या तरी बाई चा घरचा प्रॉब्लेम असेल आता नीट झाला असेल, म्हणून फोन बंद असेल आणि मी माझ्या कामाला लागली दुपारी 2:46 ला पुन्हा त्या नंबर वरून फोन आला मी तो फोन घेतला त्या मुली नी मला सांगितले ताई मला तुम्ही मदत करा नाही तर मी माझे जीवाचे काही करून घेईल आणि माझ्या मुलीला पण मारून टाकेल ती अशी बोलली तीच बोलणं मला काही समजले नाही.

मी तिला भेटण्यासाठी निघाली आणि रात्री 11:39 ला तिच्या गावात पोहचली दुसऱ्या दिवशी तिला फोन केला आणि तिला मी भेटले.

नाव बदलले आहे (तिनी तिचे नाव सांगितले स्वाती )स्वाती तिचे नाव दिसायला खूप सुंदर आणि तिच्या हुन अधिक सुंदर तिची मुलगी खूप cute मग तिने तिच्या बदल सांगायला सुरु केले.

आई वडील नाही "मामा मामी" आई वडील तिचे ती 8 वीला असताना हे जग सोडून गेले मग ती मामा मामी जवळ राहत होती. तिला बहीण नव्हती भाऊ नव्हता ती एकटी मामा मामी नि तिला शाळेतून काढून घरीच ठेवले आणि मामी सांगू लागली मुलीच्या जातीला घर काम आले पाहिजे मग घरकाम शिकले की मग काही दिवसांनी लग्न झालं.

नवरा हॉटेलमध्ये कामाला होता सासू आणि सासरे गावी राहायला असल्यामुळे घरी ती आणि तिचा नवरा राहत होते. तिच्या नवऱ्याने तिला तो ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्या हॉटेलमध्ये कामाला लावले होते. दिवसभर हॉटेलमध्ये काम आणि संध्याकाळी घरी आल्यावर तिचा नवरा दारू पिऊन तिला त्रास द्यायचा.

तरी पण ती सर्व सहन करत होती कारणं काय, तर एक दिवस तिचा नवरा सुधारेल नक्की पण सर्व उलटे होत होते. तिच्या नवऱ्यानी काम सोडून दिले ती दिवसभर घरी दारू पिऊन पडून असे. स्वाती हॉटेलमध्ये काम करायची दिवसभर आणि रात्री घरी आली की नवऱ्याचा त्रास बघता बघता तिला दिवस गेले तरी पण तिने 7 महिने हॉटेलमध्ये काम केले आणि ती नवऱ्याला बोलली की आता 2 महिन्यानंतर डिलेवरी होईल तर आपण गावी जाऊ आई-वडीलांजवळ, त्यावर नवरा नाही बोलला तरी स्वाती तिच्या सासू सासऱ्याजवळ गेली त्यांच्या तिथे राहून तिला दोन महिने कसे गेले समजले नाही तिला मुलगी झाली.

तिला वाटले आता नवरा सुधारेल आणि ती काही दिवसात नवऱ्याजवळ निघून येते ती घरी नाही येत तर तिला नवऱ्यानी हॉटेलमध्ये मध्ये कामाला पाठवले पण हॉटेल मालकांनी तिला कामावर घेतले नाही. हे सर्व करता ( तिला काय माहीत की तिच्या नवऱ्याला आता आयते बसून खाण्याची सवय झाली) तिने खूप काम बघितले तिला कोणी काम देत नव्हते तिला टेन्शन आले की घराच भाडं द्याचे घरात किराणा नाही नवरा दिवस रात्र पिऊन पडून असतो आता मुलीची जबाबदारी आली कसे होईल. रात्र झाली घरी जेवण बनवण्यासाठी काही नाही तिने नवऱ्याला सांगितले तिच्या नवऱ्यानी तिला मारले आणि घराबाहेर निघून गेला...

काही वेळाने नवरा सोबत हॉटेल मालक येत होता घरी हे तिने बघितले. तिला समजत नव्हते की आपल्या नवरा सोबत हॉटेल मालक का येत घरी. घरामध्ये नवरा आणि हॉटेल मालक येतात. नवरा तिला बोलतो पाणी दे... ती पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जाते आणि पाणी घेऊन येते तर बघते की, तिचा नवरा बाहेर उभा आणि हॉटेल मालक घरात बसून होता तिला काही समजत नव्हते ती घाबरून गेली. तिचा नवरा बाहेरून दार लावून घेतो तिला जे चालले ते काही समजत नाही. हॉटेल मालक तिच्यावर जबरदस्ती करतो ती कशी तरी बाहेर पळून येते आणि तिच्या नवऱ्याला सांगायला लागते तर तिचा नवरा तिला मारतो आणि तिचा हात धरून तिला घरात घेऊन जातो आणि बोलतो चुपचाप शांतपणे राहून मालकाला खुश कर ती हे ऐकत तिच्या पाय खालची जमीन घसरली.

काही वेळानी हॉटेल मालक बाहेर जातो आणि तिच्या नवऱ्याला पैसे देतो तिला हे सर्व बघून खूप त्रास होतो. ती नवऱ्याला बोलते की मी माझ्या मामा मामी कडे जाते तर तिचा नवरा तिला काय सांगतो की तुझ्या मामा मामी कडुन मी तुला 50,000 मध्ये विकत आणली हे ऐकत तिची मरण्याचीच इच्छा झाली. पण काय करणार मुलीसाठी तिला जगायचे होते.

नवऱ्यानी घरी हळूहळू धंद्या चालू केला बायको म्हणून पैसे कमवून देणारं मशीन असे त्याला वाटू लागले. बघता बघता 2 वर्ष झाली स्वाती मशीन झाली होती नवऱ्यासाठी पैसे कमवून देणारी.

पण हे सर्व सुरु असताना तिला ताप-थंडी येत होती. ती हॉस्पिटलमध्ये मध्ये गेली आणि तिनी तिची मेडिकल केली. दुसऱ्या दिवशी तिचा रिर्पोट आला आणि त्यामध्ये तिला "HIV" झाला आहे असं कळालं. आणि तिने नवऱ्याला सांगितले तरी तिचा नवरा ऐकत नव्हता तिच्या काढून ते वाईट काम करून घेत होता. आता स्वातीला खूप त्रास होत होता. तिने नवऱ्याला सांगितले की आता माझ्याकडून हे काम होणार नाही तर आज घरी कोणाला नका बोलावू.

नवऱ्याला वाटले आता स्वाती जर नाही राहिली तर आपल्याला पैसे येणं बंद होईल. तरी त्या नवऱ्यानी घरी लोकं बोलावले. आणि मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या नालायक माणसांनी त्या दोन वर्ष च्या बाळाला धंद्यासाठी वापरले. ती जेव्हा मला हे सांगत होती तेव्हा तर माझ्या अंगावर शहारे आले इतके पण वाईट लोक असू शकतात का? स्वातीने ठरवले की आता इथून निघून जायचे काही झाले तरी रात्री स्वातीचा नवरा पिऊन पडला होता तिने तेव्हा प्लान केला पळून जायचा आणि ती आपल्या बाळा ला घेऊन पळून गेली. आणि ती पळून जात असताना तिला हॉटेल मालक बघतो. आणि तिच्या मागे जातो तो हॉटेल मालक तिच्या मागे जातो आणि तिला पकडतो आणि तिला त्याचा हॉटेल वर घेऊन जातो. मित्रांनो ती हे सांगत होती तेव्हा हे सर्व फक्त tv मध्ये बघितले होते पण आज समजते की खूप दुःखी लोक आहे जगामध्ये आपल्या सोबत आपण त्यांच्यामध्ये राहतो खरंच सर्व घरांमध्ये आज मुलगी सुरक्षित आहे का हा विचार येतो.

हॉटेल मालक तिला आणि तिच्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन जातो. तिला बोलतो मी तुला मदत करतो तू इथे राहा आणि हॉटेलमध्ये काम कर स्वातीला वाटले की आता कुठे तरी तिचे जीवन चांगले सुरु होईल. ती जेवण करते आणि तिला झोप लागते. ती सकाळी उठून बघते तर काय, तिची मुलगी जवळ नव्हती. ती हॉटेल मालकाला खूप भांडते आणि नवऱ्याजवळ जाते आणि त्याला सांगते तर हॉटेल मालक उलट- सुलट सांगतो की, तुझी बायको माझ्या जवळ पळून आली आणि मला पैसे दया मी तुम्ही बोललं तसे करेन असे सांगू लागला. स्वाती जीवनात खूप एकटी पडली होती तिची मुलगी कुठे गेली ते तिला अजूनही माहीत नाही आणि तिला आजार असल्यामुळे नवऱ्यानी घरातून हाकलून दिले होते. कारण आता ती काही कामाची नाही म्हणून स्वातीला जगायची इच्छा नव्हती. तिने जीवनात सर्व हरवले आहे ती जीव द्यायला जात असताना ती रस्त्यावर चक्कर येऊन पडते आणि तिला काही कॉलेचच्या मुलांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. ती शुद्धीवर येते. स्वातीचं कोणी नाही म्हणून ती हॉस्पिटलमध्ये बेवारसच्या रूममध्ये असते. तिला हॉस्पिटलमध्ये 12 दिवस होतात मग डॉक्टर तिच्याबद्दल सर्व विचारतात आणि तिने डॉक्टरांना सर्व सांगितले.

डॉक्टरांनी तिला माझा नंबर दिला आणि मी तिला भेटायला गेली तेव्हा मला तिच्याबद्दल सर्व समजले. स्वाती आता HIV च्या आश्रमात आहे. मला वाईट या गोष्टीच वाटते की आम्ही तिच्या मुलीला शोधू नाही शकलो. पण स्वातीला वेळेवर जेवण-गोळ्या आणि राहयला जागा दिली.

पण अश्या कितीतरी स्वाती समाजात असतील की त्या आजही गप्प राहून अन्याय सहन करतात. सात वचन हे असतात लग्न करताना घेतले जाते मात्र नंतर बाईला माणुसकीच्या नात्यानं खरचं तुम्ही थोडी इज्जत देऊ शकत नाही का? किंवा अशा अनेक स्वातीला कधी न्याय भेटणार..?

लेखिका - सुलक्षणा... ही कहाणी उस्मानाबाद येथील महिलेची असून 2 वर्षांपूर्वीची आहे...

(स्वाती आता HIV च्या आश्रमात आहे)

Updated : 18 May 2019 6:05 AM GMT
Next Story
Share it
Top