Home > रिपोर्ट > या मानसिकतेचा उद्देश काय? कोण आहे अशा घटनांमागचा 'बिगबॉस'?

या मानसिकतेचा उद्देश काय? कोण आहे अशा घटनांमागचा 'बिगबॉस'?

या मानसिकतेचा उद्देश काय? कोण आहे अशा घटनांमागचा बिगबॉस?
X

सोशल मीडियावर पोस्ट टाकून वाद निर्माण करणं हा आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक सोपा उपाय बनलाय. प्रसारमाध्यमांच्या, लोकांच्या चर्चेत राहण्यासाठी काय करायचं, तर चार ओळी, एखादा व्हिडीओ फेसबुक-ट्विटरवर पोस्ट करून टाकायच्या. त्यात महापुरुषांची बदनामी केली तर पुढचं काम आणखी सोपं होतं. पण मूळ मुद्दा हा आहे की ही मानसिकता येते कुठून?

पायल रोहतगी. बॉलिवूडमध्ये काम केलेली (किंवा करत असलेली) एक सरासरी अभिनेत्री. आजकाल सिनेमांपेक्षा राजकारणात जास्त दिसते. महापुरुषांविषयी बोलणं, त्यांची बदनामी होईल अशा आशयाच्या पोस्ट करणं हा तिचा आवडता छंदच बनलाय. काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती. याशिवाय पायलने समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1134834382273994752

महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं?

असा प्रश्न विचारत तिने शिवाजी महराजांच्या जातीचा उल्लेख केला. पायलनं ट्विट करत लिहिलंय की, 'शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म एका क्षुद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. मात्र, राज्याभिषेकासाठी त्यांनी विधिवत मुंज केली आणि आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला.

पायलनं केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये तिच्यावर टीकेची झोड उठली. तिच्या आधीच्या ट्विटबद्दल खुलासा करण्यासाठी तिनं पुन्हा एक वादग्रस्त ट्विट केलं. 'शेतकरी कुटुंबात किंवा शुद्र वर्णात जन्माला येणं हा गुन्हा नाही. आपल्या देशातील भारतीय हिंदूना आपल्या राजाबद्दलची खरी माहिती असायला हवी, शिवाय, महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलंय?' असा सवालही तिनं केलाय.

ज्यांचा इतिहास आजही जगाला प्रेरणा देतो, ज्यांच्या कर्तृत्ववानं स्फुरण चढतं त्यांच्याविषयी वाद निर्माण होईल असं बोलणं म्हणजे विकृतीच. ज्या राजानं आपल्या राज्यात कधी जात-धर्म यांना थारा दिला नाही त्यांच्या जातीविषयी लिहून पायलनं काय साध्य केलं हे तिलाच माहीत. पण आजही देशात वर्णव्यवस्थेची एक पुसटशी रेषा कायम आहे हे तिनं अधोरेखित केलं.

जिथं छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याबद्दल लोक असा विचार करत असतील तिथं तुम्हा-आम्हा सामान्यांचं काय? देश बदलतोय असं म्हटलं जातंय. जर या बदलांमुळे लोक एकमेकांना जातीपातीत पाहत असतील तर असा बदल कोणाला अपेक्षित आहे? ज्या ट्विटर अकाऊंटवरून पायलने ही वादग्रस्त पोस्ट केली त्या अकाऊंटचं नाव 'पायल रोहतगी & टीम - भक्त ऑफ भगवान राम' असं आहे. अर्थात यावरून प्रत्येकजण आपापल्यापरीने अर्थ काढतील. पण मनसेने मागणी केल्याप्रमाणे या घटनांमध्ये पडद्यामागे असलेला 'बिगबॉस' शोधणं गरजेचं आहे.

Updated : 4 Jun 2019 12:52 PM GMT
Next Story
Share it
Top