Home > रिपोर्ट > जाणून घ्या बॉलिवूडची बेबो करोनाच्या सुट्ट्यांत काय करतेय?

जाणून घ्या बॉलिवूडची बेबो करोनाच्या सुट्ट्यांत काय करतेय?

जाणून घ्या बॉलिवूडची बेबो करोनाच्या सुट्ट्यांत काय करतेय?
X

बेबो सांगतेय की गेले किमान १५ दिवस मी अक्षरशः घरीच आहे ! माझ्या घरापासून जवळच लोलो आणि मॉम राहतात पण त्यांच्याशी देखील त्यांच्या घरी जाऊन गाठभेट करू नये असं भीतीदायक वातावरण आहे सध्या ! मी असली कपूर पंजाबन म्हणजे आम्ही पिढ्यान पिढ्या खवय्ये असल्याने दररोज काहीतरी डेजर्ट घरी करायला सांगते. गाजर हलवा, कणकेचा भरपूर तूप -गूळ -केशर घालून केलेला शिरा मला आवड्तो आणि थोडा बहुत व्यायाम चालू आहे. मी आणि सैफ दोघंही एकाच घरी असण्याचा दुर्मिळ योग सध्या लेकाला, तैमूरला मिळालाय. त्याच्याशी खेळणं आणि खेळतांना आम्ही दोघांनी हरणं ह्यात तैमूरला खूप मजा येतेय. आणि हो, मी इंस्टाग्रामवर तशी लेट आलेय त्यामुळे अधूनमधून मी माझा वेळ इंस्टावर माझे फोटोज अपडेट करत असते.

कोरोना वादळ शमले की सर्व प्रथम करण जोहरच्या 'तख्त ' (फिल्म )चे शूटिंग सुरु होईल .

पाहूया काय होतंय ते. नैसर्गिक आपत्तीसमोर आपण फार खुजे आहोत हे ह्या खेपेस प्रकर्षाने नियतीने दाखवून दिलंय ! सो वेट एन्ड वॉच पेशंटली !'

Updated : 24 March 2020 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top