Home > रिपोर्ट > चक्क 'या' महिला सीईओने केला कर्मचाऱ्यांसोबत डान्स...

चक्क 'या' महिला सीईओने केला कर्मचाऱ्यांसोबत डान्स...

चक्क या महिला सीईओने केला कर्मचाऱ्यांसोबत डान्स...
X

तुमच्यावर कामाचा ताण वाढतो आहे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये खेळीमेळीचं वातावरण नाही. जर का अशावेळी चक्क तुमच्या सिइओ नेच तुमच्या सोबत डान्स केला तर... काहीसा असच प्रकार आरपीजी ग्रुप मधील कर्मचाऱ्यांसोबत घडलाय. RPG ग्रुप दीपाली गोएंका या ऑफिस मध्ये मुकाबला या गाण्यावर थिरकल्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली.

RPG ग्रुप च्या अध्यक्षपदी असणाऱ्या हर्ष गोएंका यांनी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये दीपाली 'स्ट्रीट डान्सर ३डी' या चित्रपटातील 'मुकाबला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे सीईओ पदावर असणाऱ्या दीपाली यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मंडळींसोबतच थिरकत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असणारं गंभीर वातावरण काही काळासाठी का असेना, पण अतिशय उत्साही आणि आनंददायी केलं.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यानेही सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून भारावल्याची भावना व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याला दाद दिली आहे. नोकरीच्या ठिकाणी हवहवंसं वाटणारं वातावरण आणि तणावग्रस्त दिनचर्येतही मिळणारे काही अप्रतिम क्षण या व्हिडिओतून प्रत्यक्ष पाहता आले. तेव्हा आता आपल्या कामाच्या ठिकाणी अशी आनंदाची आणि वेगळेपणाची बरसात तुम्ही कधी करताय?

Updated : 21 Feb 2020 3:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top