खामगावमध्ये सामान्य रुग्णालयाकडून स्री जन्माचे स्वागत
X
मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती तशी या समाजात जुनीच आहे. त्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकत असतो. मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता शासनाकडून या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. याच पार्श्वभूमीवर स्त्रीजन्माचे स्वागत करत कन्या रत्न मातांचा खामगाव सामान्य रुग्णालयाकडून आरोग्य विभागाच्याच्या वतीने लेक वाचवा, लेक शिकवा मोहिमे अंतर्गत जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचे स्वागत साडी चोळी आणि झबला टोपी देऊन आणि सकस आहार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर अश्या मायलेकींचा दर आठवड्याला बुधवारी सन्मान होणार असून या उपक्रमाची सुरुवात परिचरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे.
योजनेमुळे मुलींचे जन्माचे प्रमाण वाढणार असून अशा योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून त्याचा फायदा जनसामान्यांना झाला पाहिजे, असे मत डॉ. निलेश टापरे यांनी व्यक्त केले. या आरोग्य केंद्राने ही योजना यशस्वीपणे राबवत उल्लेखनीय काम केल्याबद्दल समाजातून अश्या योजनांना प्रतिसाद मिळत आहे.
https://youtu.be/quP_Y0D2HF4