Home > रिपोर्ट > यशोमतींनी दिला दम, चिक्की बिक्की काही चालणार नाही, त्यानंतर सुरू झाली वादांची मालिका

यशोमतींनी दिला दम, चिक्की बिक्की काही चालणार नाही, त्यानंतर सुरू झाली वादांची मालिका

यशोमतींनी दिला दम, चिक्की बिक्की काही चालणार नाही, त्यानंतर सुरू झाली वादांची मालिका
X

महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीमध्ये महिला बालविकास विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी तसंच विभागीय अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठक संपताना यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकाऱ्यांना आपलं व्हिजन सांगीतलं आणि कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात सूचना केल्या.

याच दरम्यान यशोमती ठाकूर यांनी चिक्कीचा मुद्दा ही उपस्थित केला. कोर्टात प्रलंबित केसेसच्या बाबतीतही यशोमती ठाकूर यांनी विचारणा केली. चिक्की-बिक्की सारखं काही चालणार नाही, बेशिस्त खपवून घेणार नाही असा दम यशोमती ठाकूर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरला.

आढावा बैठकीनंतर यशोमती ठाकूर आपल्या मतदारसंघातील पूर्वनियोजित दौऱ्यासाठी निघाल्या.

यानंतर त्यांच्या भाषणातील मुद्दे काढून त्या क्लिप सोशल मिडीयावर वर पसरवण्यात आल्या. यासाठी काही व्यावसायिक कंपन्यांची मदत ही घेण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. चिक्की-बिक्की बाबतच्या विधानानंतर लगेचच सुरू झालेल्या या वादांच्या मालिकेमागे महिला-बाल कल्याण विभागात कार्यरत असलेली कंत्राटदारांची लॉबी तर नाही ना असा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

Updated : 15 Jan 2020 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top