Home > रिपोर्ट > अभिनेत्री मेघाच्या ‘या’ फोटोवर माथेफिरूच्या अश्लील कॉमेंट्स

अभिनेत्री मेघाच्या ‘या’ फोटोवर माथेफिरूच्या अश्लील कॉमेंट्स

अभिनेत्री मेघाच्या ‘या’ फोटोवर माथेफिरूच्या अश्लील कॉमेंट्स
X

प्रसिद्ध लावणी कलाकार आणि अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadage) यांच्या फेसबुक पोस्ट वर अश्लील कमेंट केल्याने मराठी चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. मेघाने परतू चित्रपटातील सहकलाकारासोबत असलेला एक फोटो पोस्ट केला. त्या पोस्टवर स्वरूप पांडा या व्यक्तीने अश्लील कमेंट केल्याचं समोर आलं आहे.

दोन दिवसांपुर्वी अभिनेत्री मेघा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर सहकलाकारासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर सरुप पांडा नामक व्यक्तीने अश्लील कमेंट केली यावर मेघाने "दादा केली तक्रार पोलिसात.. 3 दिवस लागतिल म्हणाले" असं उत्तर दिलं.

Megha Ghadage Facebook Courtesy : Social Media

तरीही न थांबता पुढे त्या व्यक्तीने अधिक किळसवाण्या शब्दात कमेंट चालूच ठेवल्या. विशेष म्हणजे हे सर्व चाललं असताना इतरही चाहते फोटोवर आपली प्रतिक्रिया देत होते. मात्र, एक दोन व्यक्ती वगळता कोणीही त्या माथेफिरुला विरोध केला नाही.

vulgar comments on Megha Ghadage's  facebook  Courtesy : Social Media

याप्रकरणी मेघा घाडगे यांनी मिरारोड मधील नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तक्रार दाखल करताना मला या टेबलवरून त्या टेबलवर फिरवण्यात आल. नयानगर पोलिसांनी तब्बल १२ तासांनी तक्रार दाखल करून घेतली. या संपुर्ण घटनेमुळे फार मानसिक त्रास होतो आहे असं मेघा घाडगे यांनी सांगितलं. पोलिस ठाण्यातील घडला प्रकाराबद्दल त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपला अनुभव सांगितला आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/193015588466054/

मीरारोडमधील नयानगर पोलिस ठाण्यात याविषयी विचारणा केली असता त्यांनी दिरंगाई केल्याचा आरोप नाकारला आहे. "मेघा घाडगे आल्या असताना पोलिस अधिकारी अन्य महत्त्वाच्या घटनेत व्यस्त होते. त्यांना आम्ही संध्याकाळी सहा वाजता येण्याची विनंती केली. संध्याकाळी त्या आल्यानंतर गुन्ह्याची चौकशी करुन आरोपी सरुप पांडा याच्या नावे तक्रार दाखल केली " असं त्यांनी म्हटलं आहे.

Updated : 24 Feb 2020 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top