Home > रिपोर्ट > मारहाण झालेल्या त्या प्रेमी युगुलाने केले लग्न…

मारहाण झालेल्या त्या प्रेमी युगुलाने केले लग्न…

मारहाण झालेल्या त्या प्रेमी युगुलाने केले लग्न…
X

जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथे बुलडाणा जिल्ह्यातील प्रेमीयुगुलास मारहाण करण्याची घटना समोर आली होती त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने या प्रेमी युगुलाने आता लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमीयुगल हे जालना जिल्ह्यात फिरायला गेले असताना जालना जिल्ह्यातील गोंदेगाव येथील काही तरुणांनी या प्रेमीयुगुलाची छेड काढत मारहाण केली होती, तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता या घटनेने सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला आणि त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक केली होती मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने आता या प्रेमीयुगुलाने काल मेहूना राजा येथे मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे तसे त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पीडित मुलगा – मुलगी ही देऊळगाव राजा तालुक्यातील असून मुलगी ही फार्मसी कॉलेज ला प्रथम वर्षाला शिकत आहे तर मुलगा हा अकोला येथे अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Updated : 4 Feb 2020 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top