Home > रिपोर्ट > विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावर विद्या चव्हाण यांच्या सुनेची प्रतिक्रीया

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावर विद्या चव्हाण यांच्या सुनेची प्रतिक्रीया

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावर विद्या चव्हाण यांच्या सुनेची प्रतिक्रीया
X

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी काल मंगळवारी माध्यमांसमोर त्यांच्या सुनेने दाखल केलेल्या तक्रारीसंबधित गौप्यस्फोट केला होता. आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं विद्या चव्हाण यांनी सांगितलं होत. हे सर्व प्रकारण राजकीय वळण घेत असताना विद्या चव्हाण यांनी हा खुलासा केला. तत्पुर्वी भाजप नेतेही या प्रकरणात आक्रमक भुमिका घेताना पाहायला मिळाले होते.

संबंधित बातमी..

दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विद्या चव्हाण यांच्या सुनेने आपली प्रतिक्रिया उघडपणे झी २४ तास या वृत्तवाहिनीकडे दिली आहे.

विद्या चव्हाण यांनी माझ्यावर केलेले विवाहबाह्य संबंधाचे आरोप खोटे असून माझ्यावर सर्व कुटुंबियांनी मिळून छळ केल्यानंतर मी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर कुटुंबियांनी माझ्याविरोधात खोटे पुरावे गोळा करुन बदनामी करणार, अशी धमकी दिली होती. असा खुलासा केलाय.

माझ्या पाच वर्षाच्या मुलीपासून मला वेगळं केलं आहे आणि मी तक्रार मागे घ्यावी म्हणून त्यांनी मला तिच्यापासून दूर केलंय. माझ्या दिराने माझा शारिरिक छळ केला. आमच्यावर केलेले FIR आणि केस मागे घे तरच तुला तुझी मुलगी दिसेल अशी धमकीही विद्या चव्हाण यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यानंतर माझ्या मुलीला परत मिळवण्यासाठी मी कोर्टात गेले असं विद्या चव्हाण यांच्या सुनेने म्हटलंय.

Updated : 4 March 2020 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top