Home > पर्सनॅलिटी > विद्या बाळांची कौतुकाची थाप, काम करण्यास उर्मी देऊन गेली – त्रिवेनी बोंडे

विद्या बाळांची कौतुकाची थाप, काम करण्यास उर्मी देऊन गेली – त्रिवेनी बोंडे

विद्या बाळांची कौतुकाची थाप, काम करण्यास उर्मी देऊन गेली – त्रिवेनी बोंडे
X

काही व्यक्तीमत्व चटकन आपल्याला प्रेमात पाडतात. आदरणीय विद्या बाळ ह्या त्यापैकी एक. नारी समता मंच या संस्थेला कर्वेत शिकत असतांना दिलेली भेट. त्या भेटीतून विद्याताईंचे काम अर्थात संस्थेचे काम समजावून घेता आले. पण त्याहीपेक्षा मला भावले ते विद्याताईंचे स्पष्ट विचार आणि त्यांचे हसमुख व्यक्तीमत्व.

ताईंना भेटण्यापूर्वी अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांशी भेटणं, बोलणं झालेलं. माझ्यातील स्त्रीवादी विचारांची स्वत:ची समज त्यांच्याशी जुळली. कारण महिला महिला असते. एक व्यक्ती म्हणुन जीवन जगण्याचा निर्णय घेण्याचा तिला पुर्णपणे अधिकार आहे. करणी आणि कथनी मध्ये अंतर नसेल तर त्यातील अनेक पैलू मनात घर करून जातात.

एक आठवण अशी की कर्वे मध्ये शिकत असताना स्नेहसंमेलन निमित्त काही स्पर्धा आयोजीत केलेल्या प्रेमपत्र लिखाण त्यापैकी एक.

मी इतर स्पर्धासह यामध्येही सहभाग नोंदवला. स्वत: विविध वस्तुंचा वापर करून कार्डचे डिझाईन तयार केलेले. त्यावरिल लिहीलेला मजकुर हा परिक्षकांना भावला. आणि मला प्रथम क्रमांकांचा पुरस्कार स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहूण्या आदरणीय विद्याताई बाळ यांच्या हस्ते मिळाला.

विशेष म्हणजे त्यांनी सर्वांसमोर प्रेमपत्र वाचायला सांगितले. वाचून झाल्यावर म्हणे की ‘आवाज, सौंदर्य आणि लिखाण याचे याठिकाणी साक्षात त्रिवेणी संगम झाला. तुझं अभिनंदन!!’

लिहीत रहा पुरस्कार मिळाला याचा आनंद होता. पण ताईंनी जे कौतूक केले होते. त्याची उंची नक्कीच मला त्यावेळी मोठी करून गेली. परत एकदा भेटण्याची इच्छा राहून गेली.

विद्याताईना विनम्र श्रध्दांजली सह अभिवादन...

Updated : 31 Jan 2020 3:14 PM GMT
Next Story
Share it
Top