Home > रिपोर्ट > सीमा हिरेंना शिवसैनिकांचे आव्हान

सीमा हिरेंना शिवसैनिकांचे आव्हान

सीमा हिरेंना शिवसैनिकांचे आव्हान
X

नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे (Nashik west Sima Hire) यांच्या विरोधात तब्बल चार बंडोबा उभे राहिल्यामुळे सीमा हिरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवेल असा अंदाज शिवसैनिकांनी बांधला होता. मात्र, भाजपच्या हिरे यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळताच, शिवसेनेनं या मतदारसंघावर आपला दावा जाहीर केला. शिवसैनिकांचा रोष पाहून विद्यमान आमदार सिमा हिरे यांनी उमेदवारी जाहीर करून मतदार आपल्याच पारड्यात मत टाकतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, मामा ठाकरे आणि दिलीप दातीर यांनी मतदारसंघात आपलंच वर्चस्व आहे, त्यामुळे निवडणूक लढणारच अशी आक्रमक भूमिका घेतली. या बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास मतविभाजनामुळे याचा थेट परिणाम भाजपच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे यांच्यावर होणार आहे.

Updated : 6 Oct 2019 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top