सभागृहात महिला आमदार आक्रमक; विधानसभा दिवसभरासाठी तहकूब
X
विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेत विरोधकांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षातील महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर घोषणाबाजी केली. तसंच शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सुरूवातीला १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
भाजप आमदार मोनिका राजळे यांनी महिला आमदारांसह सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सभागृहाचे अध्यक्ष नाना पटोले यांचं महिला अत्याचारांकडे लक्ष वेधून त्यासंदर्भात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळल्यामुळे महिला आमदार अधिक आक्रमक झाल्या. यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसाभरासाठी तहकुब करण्यात आलं.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/635533526995693/?t=1