Home > रिपोर्ट > म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने लगावला मोदींना टोला

म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने लगावला मोदींना टोला

म्हणून पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने लगावला मोदींना टोला
X

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने पुन्हा एकदा भारताविषयी वादग्रस्त ट्विट केले आहे. तिने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर टीका केल्यानंतर आता वीणाने भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन ३२ विमानाविषयी वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटवरून वीणावर चहुबाजूंनी टीका होत आहे. सोमवारी दुपारी वायूसेनेचे विमान बेपत्ता झाले ,यामध्ये १३ जण होते. दरम्यान भारतीय वायूदल या विमानाचा शोध घेत आहे. वीणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करीत ट्विटमध्ये म्हटले आहे की,

‘इंडियन एअरफोर्सचे एएन ३२ क्रॅश झालेले नाही. आकाशात खूप ढग जमा झाले असून रडारला त्या विमानाचा शोध घेणे शक्य नाही - वायूसेना शास्त्रज्ञ पीएम श्री नरेंद्र मोदी’

https://twitter.com/iVeenaKhan/status/1135604214091173888

दरम्यान या ट्विटनंतर वीणावर टीकेची झोड उठली आहे. याआधीही वीणाने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्याअभिनंदन वर्धमान यांच्यावर टीका केली होती.त्यावेळी भारतीय अभिनेत्री स्वरा भास्करने वीणाची चांगलीच कानउघडणी केली.

Updated : 6 Jun 2019 3:44 AM GMT
Next Story
Share it
Top