Home > रिपोर्ट > अशी करा पर्यावरणपूरक वटपोर्णिमा साजरी

अशी करा पर्यावरणपूरक वटपोर्णिमा साजरी

अशी करा पर्यावरणपूरक वटपोर्णिमा साजरी
X

सध्या पर्यावरणातील होणारे बदल... त्यामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम खूप घातक ठरत चालले आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, रोगराईचे साम्राज्य इ. संकट येत आहेत ते पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे... असं सर्व असताना साताऱ्यातील हिरवाई संस्थेनं यंदाची वटपौर्णिमा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे ठरवलं आहे.

वटपोर्णिमा म्हणजे विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी व्रत करुन वडाच्या झाडांची पूजा करतात जेणे करुन आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. महिलांच्या या सणानिमित्ताने वटपोर्णिमेला पर्यावरणाच्या व मानवी जीवनाच्या दीर्घायुष्यासाठी 200 महिला एकत्र येऊन शंभर वडाची झाडं लावण्याचा उपक्रम करणार आहेत. हिरवाई संस्थेच्या माध्यमातून 16 जून ला हिरवाई सदर बाजार सातारा येथे सकाळी 11 वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तरी या उपक्रमाचा आपण सर्वांनी आर्दश घेऊन पर्यावरणपूरक वटपोर्णिमा साजरी करावी.

Updated : 9 Jun 2019 10:39 AM GMT
Next Story
Share it
Top