Home > रिपोर्ट > वसूंधरा राजेचं ‘हे’ वक्तव्य ठरतयं चर्चेचा विषय

वसूंधरा राजेचं ‘हे’ वक्तव्य ठरतयं चर्चेचा विषय

वसूंधरा राजेचं ‘हे’ वक्तव्य ठरतयं चर्चेचा विषय
X

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय क्षत्रिय महासभा’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपाती प्रतिभाताई पाटील या देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान बोलताना वसुंधरा राजे यांनी महिला मंत्री आणि पुरूष मंत्री यांच्यातील फरकाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भाषणादरम्यान, विरोधकांनी आपल्या अनेक अफवा पसरवल्या आहेत असा आरोप वसुंधरा राजें यांनी केला. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “महिला नेत्यांना पुरुष नेत्यांप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटता येत नाही. पुरुष नेते रात्री लुंगी नेसूनही कार्यकर्त्यांना भेटू शकतात. महिला नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो हे या टीकाकारांना समजायला हवं. कारण महिलांना काही मर्यादा असतात” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

याच कार्यक्रमातील फोटो ट्विट करत त्यांनी हे मत सोशल नेटवर्किंगवरही पोस्ट केलं आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य आणि ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्वपक्षीय नेत्यांकडूनही वसुंधरा राजे अनेकदा भेटीसाठी वेळ देत नाही अशी तक्रार केली जाते. यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं म्हटल जातं आहे.

Updated : 15 Nov 2019 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top