Home > रिपोर्ट > धारावी ते मंत्रालय... दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास

धारावी ते मंत्रालय... दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास

धारावी ते मंत्रालय... दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास
X

धारावी मतदारसंघाच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्री म्हणून शपथ घेतली. धारावी हा कॉंग्रेसचा गड मानला जातो. वर्षा गायकवाड या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘धारावी’ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्या महाराष्ट्र विधानसभेवर चौथ्यांदा निवडूण गेल्या आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड या लहानपणापासूनच राजकारण बघत आल्या आहेत. वडिलांकडून राजकारणाचे संस्कार घेत गायकवाड यांनी घाटकोपर इथल्या झुनझुनवाला कॉलेजमधून सायन्स मधून पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून गणित विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसंच बीएडही पूर्ण केले आहे.

शिक्षण पूर्ण होताच वडिलांचा वारसा पुढे चालवत त्यांनी २००४ ला पहिल्यांदा निवडणूक लढवली. तेव्हापासून हा मतदारसंघ सातत्याने काँग्रेसकडे राहिलेला आहे. गायकवाड यांनी जोमाने कामास सुरूवात करत, घरोघरी जाऊन सारा मतदारसंघ पिंजून काढत प्रचारास केला. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५३ हजार ९५४ मते मिळवत विजय मिळवला. जवळपास ११ हजार मतांनी त्यांनी आशिष मोरे यांना पराभूत केले.

स्थानिकांच्या सुखःदुखाशी स्वतःला जोडून काम करत, दांडगा जनसंपर्क आणि विचारांशी बांधिलकी या कारणांनी धारावी विधानसभा मतदासंघ गायकवाड घराण्याशी जोडला गेला. २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघाने आपले माप काँग्रेसच्या पदरात टाकून मुंबईतील काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम केलं.

मुंबई जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ शहरी असला तरी झोपडपट्टी लोकवस्तीमुळे वेगळा मानला जातो. अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय तसेच मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. इथले प्रश्न, समस्या या इतर मतदारसंघापेक्षा वेगळ्या आहेत. या समस्या सोडविणे तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्प हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवली आहेत.

Updated : 30 Dec 2019 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top