Home > रिपोर्ट > विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी वर्षा गायकवाड यांची वर्णी?

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी वर्षा गायकवाड यांची वर्णी?

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी वर्षा गायकवाड यांची वर्णी?
X

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेते पदी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार याचा फैसला आज होणार आहे. या संदर्भात काँग्रेस आमदारांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख, आमदार वर्षा गायकवाड आणि विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे वाढते समर्थन पाहता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार समोर ठेवून वर्षा गायकवाड यांना दलित समाजाचं नेतृत्व म्हणून पुढं आणण्याची काँग्रेसची रणनीती आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाडा महत्त्वाचा असल्याने विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.

Updated : 20 May 2019 1:23 PM IST
Next Story
Share it
Top