Home > रिपोर्ट > ‘..तर रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशीत करु’; प्रणिती शिंदेंना वंचितची धमकी

‘..तर रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशीत करु’; प्रणिती शिंदेंना वंचितची धमकी

‘..तर रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशीत करु’; प्रणिती शिंदेंना वंचितची धमकी
X

आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीच्या वक्तव्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मात्र, प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना एका महिला आमदाराच्या खाजगी आयुष्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करण्यामुळे हा वाद अधिक पेटलाय.

“रेव्ह पार्ट्यांमधून फुरसत भेटत असेल तर कळेल की वंचित आणि प्रकाश आंबेडकरांनी कुठे कुठे सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करतायत. प्रणिती शिंदे यांनी सभ्य भाषेचा वापर करावा अन्यथा रेव्ह पार्ट्यांमध्ये सापडलेल्या त्यांच्या बातम्या प्रकाशीत कराव्या लागतील.” असा धमकीवजा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे (Rajendra Patode) यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय.

“अनुसूचित जातींवर अन्याय होत असताना वंचित (Vanchit) आणि एमआयएम (MIM) कुठे गेले. त्यांनी CAA, NRC विरोधात एकतरी आंदोलन केलं का? कुठे गेलं रक्त आणि कुठे गेले वंचित? असा प्रश्न प्रणिती शिंदेंनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात उपस्थित केला होता. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध वंचित संघर्ष सुरु झाला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. प्रकाश आंबेडकरांना मत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताला मत असा प्रचार करण्यात आला होता. यावरुन प्रणिती शिदे यांनी कुठे गेलं रक्त आणि कुठे गेले वंचित? अशी विचारणा केली.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

“अनुसूचित जातींच्या विरोधात एवढी मोठी चालं सुरु असताना तुम्ही तर आता दिसतच नाही. ते त्यांचेचं बगलबच्चे आहेत. वाह रे मोदी तेरी चाल, वंचित एमआयएम तेरे दलाल,” असे प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

“ही सुरुवात आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वेगळाच विषय आहे. दिवस गेला तरी ते संपणार नाही. वाढत्या एलपीजीचा दर असेल, अनेक विषयांविरोधात आपल्या सर्वांना माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर उतरायचे आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. या मोदी-शाहाच्या चाल आणि भाजपच्या अतिशय विकृत मानसिकतेच्या विरोधात आपण अजून पेटून उठूया,” असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या.

यावर उत्तरादाखल राजेंद्र पातोडे यांनी “राहिला प्रश्न मोदी हस्तक असल्याचा तर विधानसभा निवडणुकीत त्यांचे वडील एका उमेदवारी करीता संघ शरण गेले होते, हे सोलापूर जिल्ह्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांचे रक्तातील नात्याचे चुलत भाऊ अजित पवार ह्यांनी तर पहाटे पहाटे भाजपचे मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला ते काय होते? भविष्यात आपल्या पदाचा आणि आपण स्त्री असल्याचा आब राखुन त्यांनी बोलावं” असा वक्तव्य राजेंद्र पातोडे यांनी केलंय.

Updated : 22 Feb 2020 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top