Home > रिपोर्ट > VBA च्या जाहीरनाम्यात महिलांच्या रोजगाराचा मुद्दा अव्वलस्थानी

VBA च्या जाहीरनाम्यात महिलांच्या रोजगाराचा मुद्दा अव्वलस्थानी

VBA च्या जाहीरनाम्यात महिलांच्या रोजगाराचा मुद्दा अव्वलस्थानी
X

निवडणुका सुरु झाल्या मात्र तुम्ही पक्षांचे जाहीरनामा पाहिलेत का... नाही ना... वंचित बहुजन आघाडीने स्त्रियांसाठी नेमकं काय दिलं आहे जाणून घेऊयात खालील प्रमाणे

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा

स्त्रीकेंद्री, स्त्रीवादी भूमिकांचा स्वीकार वंचित बहुजन आघाडीचा अग्रक्रम...

आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील स्त्रीयांचा सहभाग नेतृत्व भागीदारी घडवणे आणि वाढवणे

आरोग्य शिक्षण रोजगार निर्मितीत स्त्रीकेंद्री आणि स्त्रीवादी दृष्टीकोनांचा स्वीकार करेल.

बलात्कार विरोधी कठोर कायद्यांबरोबरच व्यापक प्रबोधन मोहिमासह बलात्कारीत स्त्रियांच्या पुनर्वसनाचे योग्य प्रारुप विकसित करणार

स्त्री अभ्यासाचे विस्तारीकरण करुन हा विषय प्राथमिक शाळा के महाविद्यालयापर्यंत सक्तीचा करणार

लिंगभाव समानतेचा केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणार

स्त्री अभ्यास केंद्रांची सध्याच्या सरकारकडून होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील स्त्री-अभ्यास केंद्रांना कायमस्वरुपी विभागांमध्ये रुपांतरीत करणार

शेतमजन, सालगडी, घरकामगार, ऊसतोड कामगार, कागद-काचपत्रावेचक, विकासबाधित आदिवासी तसेच असंघटीत, असुरक्षित क्षेत्रात कार्यरत स्त्री- पुरुष समूहांकरीत विशेष धोरण निर्मित करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच विधीमंडळांमध्ये व पार्लमेंटमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असाव्यात असे वंचित बहुजन आघाडीचे धोरण राहील.

स्त्रीयांसोबतच बालकांच्या मनवाधिकारांचे संरक्षण हा वंचित आघाडीचा अग्रक्रम राहिल.

Updated : 11 April 2019 6:54 PM IST
Next Story
Share it
Top