उर्मिला मातोंडकर यांनी दिला काँग्रेसला राजीनामा...
X
हिंदी सिनेमा सृष्टीत नावजलेली अभिनेत्री तसेच काँग्रेस पक्षातून लोकसभा निवडणुक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुक लढवली होती पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
“मुंबई काँग्रेसमध्ये महत्वाची पदे सांभाळणाऱ्यांनी पक्षाच्या भल्यासाठी काहीही बदल करायचा प्रयत्न केला नाही. माझी राजकीय आणि सामाजिक जाण स्वतःचा पक्षांतर्गत राजकारणासाठी वापर होऊ देण्यापासून परावृत्त करते. मला मुंबई काँग्रेसमध्ये व्यापक उद्दिष्टांसाठी काम करायचं होतं”, असे उर्मिला यांनी पक्षाविषयी टीका करताना सांगितले. सोबतच राजीनामा दिला असला तरी मी माझ्या विचारधारेसोबत लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.