Home > रिपोर्ट > उर्मीला मातोंडकर , RSS प्रमुख मोहन भागवत यांची पुतनी आहे का?

उर्मीला मातोंडकर , RSS प्रमुख मोहन भागवत यांची पुतनी आहे का?

उर्मीला मातोंडकर , RSS प्रमुख मोहन भागवत यांची पुतनी आहे का?
X

सोशल मिडीयावर रोज अनेक पोस्टस् व्हायरल होत असतात. त्यामध्ये कोणते खरे आणि कोणते खोटे? यात तुम्ही कनफ्यूज्ड होत असाल, आता हेच पहाना कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारी प्रख्यात अभिनेत्री उर्मीला मातोंडकर हिने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून, त्यांच्यावर सोशल मिडीयाद्वारे अनेक दावे व्हायरल होत होते. आता त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील पुन्हा त्याच चर्चेला उधान आलं आहे.

काही दिवसांपूर्वी उर्मीला मातोंडकर या RSS प्रमुख मोहन भागवत यांची पुतनी असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्याची आम्ही पडताळणी केली असता, मातोंडकर आणि मोहन भागवत यांचा दूर-दूरपर्यंत कोणताही नातेसंबध नसल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे स्वत: उर्मीलाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून तिच्या मते हा सर्व एका अकल्पनीय सिनेमा प्रमाणे आहे.

अशाप्रकारे उर्मीला मातोंडकर या RSS प्रमुख मोहन भागवत यांची पुतनी असल्याची पोस्ट पुर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट होतं

Updated : 11 Sep 2019 3:03 PM GMT
Next Story
Share it
Top