Home > रिपोर्ट > माझा पराभव ईव्हीएममुळं - उर्मिला मातोंडकर

माझा पराभव ईव्हीएममुळं - उर्मिला मातोंडकर

माझा पराभव ईव्हीएममुळं - उर्मिला मातोंडकर
X

लोकसभा निवडणुकांचा आज निकाल असून मतमोजणी सुरु आहे. यंदा पुन्हा एकदा भाजप बहुमताने विजयी होईल अशी आकडेवारी समोरं येत आहे. त्यात उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी हे आघाडीवर असून उर्मिला मातोंडकर यांना फक्त १२ हजार मत पडल्याची माहिती मिळतेय. यावरुन उर्मिला मातोंडकर यांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपाची वाटचाल बहुमताकडे सुरु असून विरोधकांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा धडाका लावलाय.

https://twitter.com/OfficialUrmila/status/1131442691219304448?s=08

Updated : 23 May 2019 1:26 PM IST
Next Story
Share it
Top