Home > Max Woman Blog > "गरीब आणि अस्पृश्य हा विषयच नाही" अरुणाच्या मुसाफिरीतून ,भाग-७

"गरीब आणि अस्पृश्य हा विषयच नाही" अरुणाच्या मुसाफिरीतून ,भाग-७

गरीब आणि अस्पृश्य हा विषयच नाही अरुणाच्या मुसाफिरीतून ,भाग-७
X

काळाकुट्ट अंधार,दोन्ही बाजूला शेत,वाऱ्याची सळ सळ,गाव कधीच मागे पडलेला आणि कुणीतरी जोरात माझ्या अंगावर येऊन आदळल.मी जाम घाबरले.अक्षरशः पाचावर धारण बसने का काय म्हणतात, ते माझ झालं. भू...भूत...भूत... करत मी ओरडायला लागले.त्या थंडीतही मला चर्र घाम फुटलेला.कुठे पळाव, हेही मला कळेना.मधल्या एक दोन मिनिटात काय झालं, माहिती नाही पण हळूहळू मी जेव्हा भानावर आले, तेव्हा मला पुरुषी आवाज येत होता.ताई कोण तुम्ही? कुठे जायचे आहे? इतक्या का घाबरल्या?"

Image result for काळाकुट्ट अंधार,दोन्ही बाजूला

त्याने त्याच्या जवळचा टॉर्च सुरू केला होता.त्या प्रकशात मला तो एक गलेलठ्ठ तरुण मुलगा आहे, ऐवढे कळले होते.त्यामुळे मी एकदम हुशश केले.त्याला सांगितलं, अंधारात मला तुम्ही दिसला नाहीत, कोण माझ्या अंगावर येऊन आदळले या विचारानेच मी घाबरले. "

"कुठे जायचे आहे तुम्हाला? आमच्या गावात कुणाकडे आल्या की कुठे चालल्या?"

" नाही, मला आता जी बस मिळेल तिकडे जायचे आहे."

" बरं,चला मी सोडून देतो तुम्हाला."

हे ऐकुन तर मला फारच बरे वाटले. मी माझ्या पर्स मधून पाण्याची बॉटल काढली आणि पाणी प्यायले.नंतर एक चॉकलेट त्याला देऊन एक मी खाल्ल.आणि त्याच्या मागून मी चालायला लागले.रस्त्यात त्याने काही बारकेसे प्रश्न विचारले, पण आम्ही मात्र फारसे बोललो नाही.मात्र फाट्यावर पोचल्यावर त्याने माझी नीट विचारपूस केली.मी थोडक्यात त्याला माझी फिरस्ती कहाणी आणि या गावातला माझा अनुभव सांगितला. त्यावर तो म्हणाला,"अहो ताई हे तर फार वेगळं आहे. म्हणजे तुम्ही आमच्या गावात आल्या,पाटील आणि सरपंच बाई नाही म्हणून विजय कडे गेलत्या आणि आता कुठेच राहायला मिळणार नाही म्हणून तुम्ही गावातून परत चालल्या. नाही, हे काही पटत नाही बा आपल्याला.खरं त पाटील घरी नसले तरी त्यांच्याच घरी तुमची राहायची व्यवस्था झाली असती. पण तुम्ही वाड्यावर गेलाच नाहीत, नाही का?तिथे दिवानजी असतो, तो करतो सारी व्यवस्था. खूप वेगळी फिरस्ती आहे ही.मी नाही आजपर्यंत ऐकली अशी ट्रिप.बरं, ताई, माझं जरा ऐका न,आता इतक्या रात्रीचं कुठे जाणार तुम्ही?आता थांबा की इथेच आमच्या गावात.तुम्हाला चालत असेल तर माझ्या घरी थांबू शकता तुम्ही.तुमची थोडी अव्यवस्था होईल, माझ्या सारख्या गरीब आणि अस्पृश्य घरात राहायला तुम्हाला चालणार असेल,तर मला आनंद होईल."

"गरीब आणि अस्पृश्य हा माझ्यासाठी विषयच नाही, पण तुला कशाला आता त्रास?"

"त्रास नाहीच मॅडम.माझ्याघरी बऱ्याचदा कुणी कुणी थांबत असतं. आम्ही देवी बसवतो ना,तेव्हा आजूबाजूच्या गावातले मित्र येतात, कधीकधी औरंगाबादचे मित्र येतात, आमचे मिलिंदियन तर येतातच.मला नाही होणार त्रास.फक्त तुम्हाला चालतं का ते बघा."

"अरे मला न चालायला काय झालं?चल."

"5 मिनिट थांबा.मी गावातल्या मित्राला फोन करून त्याला गाडी घेऊन बोलवतो"

"अरे आणखी नको कुणाला त्रास देऊस. जाऊ की आपण पायी.3 -4की,मी,तर आहे ना."

"हो, आहे जवळच. पण आता इतक्या रात्रीचं नको. आधीच मघाशी तुम्ही खूप घाबरल्या होत्या.तो काय 5 मिनिटात येईल."

त्याने कुणाला तरी फोन लावला.तोवर मी त्याच्याशी बोलत राहिले.घरी कोण कोण आहे, तू काय करतो अशी चौकशी.तो गावातल्या कोत्वालाच मुलगा होता.त्याचे वडील 4 वर्षांपूर्वी वारले.आई मजुरी करायची.बहीण मॅट्रिकला आहे आणि तो तलाठी म्हणून काम करतो.त्याची समज मला चांगली वाटली. वाचनही होते.ब.ह.कल्याणकर,साळुंखे सर,फ.मु.शिंदे, सदानंद मोरे,यशवंत मनोहर,वामन निंबाळकर अशी बरीच लेखक मंडळी त्याने वाचली होती.वामन निंबालकरांची शब्द कविता त्याने मला म्हणून दाखविली.तेवढ्यात त्याचा मित्र आम्हाला 8घ्यायला आला.मित्राने त्याची बाईक याला दिली आणि आम्ही रमेश मसराम च्या घरी निघालो.आम्ही घरी पोचण्यापूर्वीच त्याचे 2 मित्र तिथे येऊन तयार होते. त्याने माझी ओळख करून देताना परत मला माझे नाव विचारले,मी सांगितले, त्यावर त्या दोन मित्रांमधला एक म्हणाला," अहो मॅडम, विमुक्ताकार अरुणा सबाने आपणच?"

"हो"

त्याने मला चक्क नमस्कारच केला.मॅडम, अनिल सोनार सरांनी मला ही कादंबरी वाचायला सांगितली होती. खूप भारी आहे कादंबरी.अहो त्या कादंबरीतील तो नायक काय भयानक आहे.असा माणूस असू शकतो,यावर तर आमचा विश्वासच नाही बसला.अबे रम्या आपण नाही का विद्या बुक मधून घेतलेली".

तेवढ्यात रमेशच्या बहिणीने पाणी आणले. त्यांची आई खुर्चीत बसली.हातात टिकळ्यांच्या पिवळ्या बांगड्या आणि जड जड ७चांदीचे तोडे आणि त्याच्या वरती शेवंताबाई हे त्यांचे नाव गोंदवलेले आणि त्याच्या जवळ एक फुल काढलेलं.कपाळावर सुद्धा गोंदलेलं.गुबगुबीत शरीरयष्टीच्या, मध्यम उंचीच्या शेवंताबाईचा आवाज छान खणखणीत होता.म्हणाल्या," काय रे लेकरांनो,त्यांले जरा बसू त द्या.झाल्या तुमच्या बुकातल्या गोष्टी सुरू."

Image result for काळाकुट्ट अंधार,दोन्ही बाजूला

"अग माय, या कोण आहे माहिती काय? अग या पण लिहितात." एवढं बोलून तिथेच पुस्तकांची एक लोखंडी कपाट होतं, त्यातून काही पुस्तकं इकडे तिकडे केलीत आणि त्यातून एक पुस्तक काढून तिनं आपल्या आईच्या हातात दिलं. " माय, हे पुस्तक लिहिलं यायनी"

"खरं की काय" आता त्यांच्या डोळ्यातील माझ्याप्रति निर्माण झालेला आदर एकदम वाढला. मग मुलांनी आणखी 2-4 जणांना फोन केलेत. मी फ्रेश होऊन कपडे चेंज करून बसत नक्षी, तोच रमेशच्या बहिणीने कांता ने मला,माय आणि रमेशला जेवायला वाढलं.मी म्हणाले,"आणि तू?"

"नाही,ती मागवून बसेल.आपल्याला वाढेल ना ती"

आपल्याला काय वाढावं लागतं. तू तुझी प्लेट पण घे, आपण सारे खाली बसू,मध्ये आपण भांडी ठेवू.आपलं आपलं वाढून घेऊ.चाल ये पटकन.

" नाही नाही,ते हातबोट होते मग."

"अहो आई, नाही होणार.मी पण दाव्याचा हातानी पळीनीच वाढून घेईल."

" नाही ताई,आमच्यात तरण्याताठ्या पोरी अशा साऱ्यात बसून जेवत नाही."

" रमेश, तू शिकला सावरला मुलगा, तुलाही असंच वाटतं?"

" मी मायच्या शिस्तीत बोलत नाही ताई"

त्याचं हे सावध उत्तर आहे, हे मला कळत होतं.

मी आईलाच म्हणाले," हे बघा ताई, आपण सगळे जेऊ आणि एकटी कांता मागाहून बसेल,हे मला नाही पटत.तुम्ही दोघे जेवा, मग मी आणि कांता जेवू."

"नाही नाही, असं कसं.तुम्ही पाहुण्या आहात आमच्या."

"मग काय झालं."

बहुतेक रमेशला मी मागे न हटण्याचा अंदाज आला असावा.तो आईला म्हणाला,"माय, ताई काही ऐकणार नाहीत.शिवाय त्या काही आपल्या सोयऱ्यातल्या नाही. बसू दे कांता ला पण.जेवण थंड होत आहे. आणि ताई थकल्या आहेत.त्यांना भूक लागली असेल."

"अरे पण...."

"आई आजच्या दिवस ऐक.काही होत नाही."

" कांता आपल्यासोबत जेवायला बसणार नसेल, तर मी जेवणार नाही"

ही मात्रा एकदम लागू पडली.आईनी कंटाळा आमच्यासोबत जेवायला बसायला परवानगी दिली.जेवताना आमच्या खूप गप्पा झाल्यात.रमेशच्या आईला हळूहळू माझं गावागावातून फिरणं, मी श्रीमंत (तिच्या आकालनाप्रमाणे)बाई असूनही st नि प्रवास करणं, कोतवालाच्या घरी मुक्काम करून जेवणही करणं, हे सारं खूप अद्भुत वाटत होतं.माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या कोतवालाचा भगवान परसराम चा पहिला चहा आमच्या वाड्यावर आणि माझ्या वडिलांसोबत च व्हायचा, हे ऐकल्यावर तर त्यांचा हातातला घास हातात च राहिला.

"अरे रम्या, त्या पाटलाची पोरगी आहेत, म्हणजे पाटलाचीच बायको असणार, आन तू त्यांले आपल्या घरी घिऊन आला.आर आर आर केवढं हे पाप केलंस र तू.बाई तुम्ही आधीच बोलाच्या न.अजि, मळे वाटलं असं तुम्ही तेल्या माल्या च्या. हे भलतंच आयकतो मी."

"ताई, तुम्ही इतक्या गोंधळून जाऊ नका.मी पाटलाची मुलगी आहे, पण आमच्या घरात जातीचा विषयच नाही. आणि मी फिरतच त्यासाठी की गावागावातून काही सुधारणा झाल्यात की नाही?आता बघा, तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्यासोबत एक नवी बाई जेवायला बसणार म्हणून तिला जेवायला बसून दिलं नाही. ही चुकीची पफहात आहे."

नाही, ती रोजच मागे जेवतो. आम्ही मायलेकी आधी बसतो.

"हे तर आणखीच चुकीचं.म्हणजे मुलगी-सून मागे बसणार. हे बरोबर नाही.आता तुमच्या घरात tv आहे, मुलाजवळ मोटर सायकल आहे, घरात सोफा आहे.पण तुमच्या घरात संडास नाही. नव्या बाई सोबत तरण्या ताठ्या पोरींनी जेवायला तुमची हरकत आहे आणि तीच पोरगी बाहेर उघड्यावर शी करायला जाते, ते कसं बरोबर?"

हात धुऊन आम्ही आता सोफ्यावर बसून ऐसपैस गप्पा मारत होतो. या गप्पात आता बाकीचे मित्रही सामील झालेत.रमेश ची मान पूर्ण खाली गेलेली होती.

" संडास ची आम्हाला गरज च नाही वाटत जी. फुकट पैसे कायले घालवा. तिच्याच लग्नासाठी पैसे जॅम करून राहिलो ना आम्ही. आन आमच्या सारख्यायन आता संडासात जाऊन हागाचं म्हणजे लोक काय म्हणतील?"

"अहो तुमच्या हागण्याचा आणि लोकांचा के संबंध?तुमच्या पोरीची काळजी तुम्हाला हवी न"

"नाही, हे लयच होऊन राहिलं. आम्हाला संडास bindas नाही पायजे.

"काय ग शांत, तुला उघड्यावर शौचास बसण्यापेक्षा संडास घरीच असतील तर चालेल न?"

तिनं तात्काळ हो म्हणून सांगितलं.बाहेर जावं लागतं हे आवडतच नाही पण काय करणार? अशी ती म्हणाली।

मग मी माझा मोर्चा मुलांकडे वळविला.त्यातल्या तिघांकडे संडास होता आणि 4 जणांकडे नव्हता.त्यांच्यापैकी कुणाच्याच डोक्यात ही आवश्यक बाब आहे, हे आजपर्यंत असलेलं नव्हतं.इतकी खुलासेवार चर्चाच या विषयावर आजपर्यंत झाली नव्हती.पण आता आम्ही लवकरच संडास बांधण्याचं प्रयोजन करू असे त्या मुलांनी प्रॉमिस केले.

मग आम्ही लेखक, वाचन यावर चर्चा केली.देवी बसवण्याचा विषय यापूर्वी बोलण्यात आला होता, म्हणून मी विचारलं,14 एप्रिल करता की नाही?"

हो, आमच्या गावातली तिकडच्या मोहल्ल्यातली मुलं करतात.यातली 3 मुलं त्यात सहभागी होत होती आणि 4 मुलं नाही. कारण गावातील राजकारण. शिवाय बाबासाहेब हा त्यांचा विषय.

अरे बाबासाहेब हा कुना एकाच विषय असू शकतो काय? ते सर्वांचेच.आपल्याला संविधान दिलं त्यांनी. जातीभेद नष्ट होण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात त्यांनी.आम्हा स्त्रियांसाठी किती कायदे केलेत त्यांनी. त्यांच्यामुळे मुलींना आईवडिलांच्या इस्टेटीत बरोबरीचा वाट मिळाला.मी तर त्यांना माझा बाप मानते."

"तुम्ही पाटील असून?"

"पाटलाला काय शिंग असतात के रे?

हो, आमच्याकडे ते विशेष असतात

ते जाऊ दे.पण तुम्ही सर्वांनीच बाबासाहेबांच्या जयंती मध्ये सहभागी व्हायला हवं."

"मॅडम, आम्ही गांधी जयंती करतो, तर त्यात टिकडले लोक सहभागी होत नाही,मग आम्ही का जायचं तिकडे?

खरी गोम ही होती.बराच वेळ आम्ही बोल्ट होतो. तरुणांमध्ये स्पार्क होता.राजकारणात त्यांना इंटरेस्ट होता.सोनिया गांधींनी त्यांना प्रभावित केलेलं होत.विजय गायकवादल ऊसतोड कामगार मुलांसाठी शाळा काढायची होती.त्यांच्या फोल्यात स्वप्न दिसत होतं आणि माझ्या डोळ्यासमोर मी उद्या उघड्यावर शौचास बसणार,हे भलं मोठं संकट.डोळ्यांत झोप मुलांना दिसायला लागली.मुलंच म्हणाली, चला आता मॅडमला झोपू द्या.टाटा, बाय बाय झालं आणि दारात गेलेला एक मुलगा सागर गोरे परत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "मॅडम सकाळी 6 ला मी तुम्हाला घ्यायल येतो,माझ्याकडे संडास आहे. मग तिकडेच फारशी व्हा."

मला परम आनंद झाला.

" तुझी आई कितीला उठते?"

"आमचं पूर्ण घरच 5 वाजता उठतं"

"तू पण"?

"हो. कारण मला गाई सोडायच्या असतात."

"मग तू 5 लाच येऊ शकशील?"

हो"

" ये मग. रमेश, चालेल ना, मी यांच्याकडे गेलेलं?"

"अरे तू कशाला येतो, मीच येतो ताईंना घेऊन.या चार घरापालिकडे तर आहे."

माझा जगातला मोठ्ठा प्रश्न सुटल्यामुळे मी त्या रात्री गाढ झोपले.

-अरुणा सबाने

Updated : 28 Dec 2019 5:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top