Home > रिपोर्ट > उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास

उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास

उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास
X

उन्नाव प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा उत्तर प्रदेशातील निलंबीत आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवलं होतं.

या प्रकरणात न्यायालयाने आता सेनगर यास १० वर्षांच्या कारावायांसह १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Unnav Rape Case) केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं.

जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी त्यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलमाखाली षडयंत्र रचने, गुन्हेगारी हत्या, पुरावे नष्ट करणे, चुकीचे रेकॉर्ड तयार करणे आणि एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये दोषी मानले.

ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष होती, असं निरीक्षण नोंदवत दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं.

या प्रकरणात माजी आमदार कुलदीपसिंह सेंगरसोबत ११ आरोपी होते. यापैकी ४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर ७ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले.

Updated : 13 March 2020 7:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top