Home > News > #LataMangeshkarbirthday : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

#LataMangeshkarbirthday : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

#LataMangeshkarbirthday : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
X

लता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लता दीदींना 'गानकोकिळा' म्हणून गौरविलं जातं. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्याविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या वयैक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या या दहा गोष्टी...

1 जवळपास 20 भारतीय भाषांमध्ये 45 हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्यामुळे लता दीदींची नोद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली आहे.

2 गायनाबरोबरच लतादीदींनी अभिनयाची आवडही जोपासली. 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.

3 लतादीदी यांचं नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं. पण, दीनानाथ मंगेशकर यांच्या ' भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी हेमा नाव बदलून 'लता' असं ठेवलं.

4 चारवेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

5 भारतातील सर्वोत्कृष्ट अशा भारतरत्न पुरस्काराने लता दीदींचा सन्मान करण्यात आला आहे. सोबतच त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अशा सर्वौच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

6 लता दीदी या एकमेव अशा व्यक्ती आहेत, ज्या ह्यात असताना त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.

7 लता दीदींनीच एकदा खुलासा केला होता की, ‘आपल्याला स्लो पॉयझन देण्यात आलं होतं.’ हिंदी साहित्यकार पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात 'ऐसा कहां से लाऊं' यामध्ये याचा खुलासा केला आहे. 1962 ची ही घटना असून तेव्हा त्या 33 वर्षांच्या होत्या.

8 लतादीदींनी पहिलं गाणं १९४२मध्ये एका मराठी चित्रपटात गायलं होतं. पण, काही कारणास्तव ते गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.

9 ‘आएगा आनेवाला’ या गाण्याद्वारे लता दीदींनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

10 वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली.

दरम्यान, 28 सप्टेंबर 1929 साली लतादिदींचा जन्म इंदौर येथे झाला. आज त्यांचा 91 वा वाढदिवस आहे.

Updated : 28 Sep 2020 6:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top