महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी - उद्धव ठाकरे
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “समाजामध्ये महिलांनी शिक्षणाच्या बळावर खूप प्रगती केली आहे. शिक्षणाची सुरुवात प्रत्येक घरात आईपासून होत असते. आईने चांगले संस्कार, चांगले शिक्षण दिल्यामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत. महिला आर्थिक विकास महामंडळातील (माविम) शहरी व ग्रामीण भागातील महिलांचे काम उत्कृष्ट आहे. महाराष्ट्र हे देशातील आगळे वेगळे राज्य असून विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. चोहोबाजूंनी विकासाच्या दिशेने महाराष्ट्र सतत पुढे जात आहे.”
माविम स्थापित बचत गटातील महिलांच्या प्रेरणादायी कन्यांना “तेजस्विनी कन्या” या किताबाने गौरविण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमीकरणात भरीव योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलां मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/QvVSrRztNkI