Home > रिपोर्ट > कोट्यवधींची संपत्ती सापडलेल्या महिला अधिकारी?

कोट्यवधींची संपत्ती सापडलेल्या महिला अधिकारी?

कोट्यवधींची संपत्ती सापडलेल्या महिला अधिकारी?
X

राजस्थानमधील उदयपुरमध्ये आदिवासी विभागात आर्थिक सल्लागार पदी काम करणाऱ्या भारती राज या एका अन्य गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. . राजस्थानमधील उदयपुरमध्ये आदिवासी विभागात आर्थिक सल्लागार पदी या महिला अधिकारी कार्यरत आहेत. दरम्यान त्यांच्या घरी आणि कार्यालयावर लाचलुचपत विभागाने छापे टाकले असून सात ठिकाणी भारती राज यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. यामध्ये चार बँक खात्यात 1.03 कोटी रूपये, एक 500 चौरस मीटरचा प्लॉट, तीन मजली हॉटेल, तसेच एका मोठ्या परिसरात दोन मोठी शोरूम असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर तीन सरकारी बँकांमध्ये चार लॉकर , 92 लाखांची एफडी, दोन दुकाने, दोन प्लॉट, 8 बँक खाती, असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या वडिलांकडून 50 लाख रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीची कागदपत्रे आणि 250 डॉलर्स, तसेच 50 युरोही जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान अजून एक गोष्ट उघडकीस आले आहे भारती यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये 21 देशांचे दौरे केल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही माहिती लाचलुचपत विभागाचे महासंचालक अलोक त्रिपाठी यांनी दिली.

Updated : 3 Aug 2019 12:23 PM GMT
Next Story
Share it
Top