Home > रिपोर्ट > सोनाक्षी नंबर एक तर लतादीदी नंबर तीन

सोनाक्षी नंबर एक तर लतादीदी नंबर तीन

सोनाक्षी नंबर एक तर लतादीदी नंबर तीन
X

सोनाक्षी सिन्हा नंबर एक तर लता मंगेशकर नंबर तीन वर.. धक्का बसला का.. नाही, हे म्युजिक इंडस्ट्रीतली क्रमवारी नाही. ही लोकप्रियतेची ही क्रमवारी नाहीय. ट्वीटर ने 2019 मधील टॉप 10 इंटरटेनमेंट हँडल ची लिस्ट प्रसारित केली आहे. त्यात सोनाक्षी सिन्हा नंबर एक वर असून दुसऱ्या क्रमांकावर अनुष्का शर्मा आहे. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर नंबर तीन वर आहेत. अर्चना कलपथी, प्रियांका चोप्रा, आलिया भट, काजल अग्रवाल, सनी लिओन, माधुरी दीक्षित, रकुल सिंग यांचा ही या टॉप टेन मध्ये समावेश आहे.

https://twitter.com/TwitterIndia/status/1204285138030301185?s=20

मनोरंजन क्षेत्रातील पुरुषांची ही ट्वीटर ने यादी जाहीर केली असून यात क्रमांक एक वर अर्थातच बिग बी अमिताभ बच्चन आहे.

https://twitter.com/TwitterIndia/status/1204285155210194944?s=20

त्यानंतर अक्षय कुमार नंबर दोन वर तर खान तीन आणि चार नंबर वर फेकले गेले आहेत. सलमान खान तीन नंबर वर तर बादशाह शाहरूख खान चार नंबर वर आहे. ऍक्टर विजय, ए आर रहमान, रणवीर सिंह, अजय देवगन, महेश बाबू, ऍट ली असे इतर हँडल पहिल्या दहा मध्ये आहेत. बॉलीवूडचा तिसरा खान अमिर खान या पहिल्या दहा मध्ये नाहीय.

Updated : 10 Dec 2019 7:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top