Home > रिपोर्ट > तृप्ती देसाई काय सांगतायत मुख्यमंत्र्यांना?

तृप्ती देसाई काय सांगतायत मुख्यमंत्र्यांना?

तृप्ती देसाई काय सांगतायत मुख्यमंत्र्यांना?
X

भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या त्यांनी केलेल्या समाजसेवेमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय त्या अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमांतून राजकीय घडामोडींवर आपली मतं मांडत असतात. नुकताच तृप्ती देसाई यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सल्ला दिला आहे.

“देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत, तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गृहमंत्रीपद एका सक्षम नेत्याकडे त्यांनी द्यावे.” असा सल्ला तृप्ती देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

“पंकजा मुंडे यांना परळीतून पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांनी मंत्रीमंडळात काम केलं आहे. त्यांनी केलेल्या कार्यांची दखल घेऊन त्यांना या मंत्रीमंडळात योग्य खात द्यावं, तसेच भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना युवकांचा चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे त्यांची देखील दखल घेतली जावी.” असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ...

Updated : 31 Oct 2019 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top