Home > रिपोर्ट > इंदुरीकरांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस  

इंदुरीकरांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस  

इंदुरीकरांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस  
X

समविषम तारखेच्या विधानामुळे वादात सापडलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना तृप्ती देसाई यांच्या वकिलाकरवी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. महिलांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या समर्थकांकरवी चारित्र्यहनन व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल १० दिवसात जाहीर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदुरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही तसेच अशी वक्तव्य मी पुढे कीर्तनात करणार नाही असे कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेले नाही तसेच त्यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझं चारित्र्यहनन, अश्लील शिवीगाळ आणि कापुन टाकण्याची भाषा करण्यात आली. परंतू त्यानंतरही इंदूरीकरांकडून कोणती माफी मागण्यात आली नाही. याबाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणार नाही असे जाहीर करावे.”

ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्या माध्यमातून ही नोटीस इंदुरीकर यांच्या पत्त्यावर पाठवली असून दहा दिवसात जाहीर माफी त्यांनी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे.

या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली होते. आरोग्य विभागाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर अखेरच्या दिवशी इंदुरीकरांनी आपली बाजू मांडली होती. त्यात “मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच केलं नाही.” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होत.

इंदुरीकर काय म्हणाले होते?

'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.”

Updated : 29 Feb 2020 9:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top