‘बुलाती है मगर जाने का नही’, तृप्ती देसाईंचं इंदुरीकरांना आव्हान
X
सम विषम तारखेच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेले इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्यातील वाद आता जास्तच चिघळताना दिसत आहे. या प्रकरणात इंदुरीकर महाराजांवर तातडीने गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तृप्ती देसाई आज दुपारी १ वाजता अहमदनगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात जाणार आहेत.
संबंधित बातम्या..
यावेळी तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच येण्याचं आव्हान केलंय. “निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी स्वतः त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून माझ्यावर टीका करण्यापेक्षा, माझे चारित्र्यहनन करण्यापेक्षा, माझी वारंवार बदनामी करण्यापेक्षा आज दुपारी १ वाजता अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात यावे.” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहली आहे.
पुढे त्यांनी लिहलंय की, “जर त्यांची बाजू सत्य असेल तरच ते पोलीस अधीक्षक कार्यालयात येतील आणि जर त्यांची बाजू असत्य असेल तर ते तिथे येणार नाहीत. इंदुरीकर हे नगर जिल्ह्यात राहतात त्यामुळे ते वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचू शकतात. तरीसुद्धा ७ तास आधी मी त्यांना या माध्यमातून जाहीर आमंत्रण देत आहे ,त्यांनी त्याचा स्वीकार करून अधीक्षक कार्यालयात यावे. “
विशेष म्हणजे इंदुरीकरांच्याच शैलीमध्ये तृप्ती देसाई यांनी इंदुरीकरांना आव्हान दिलय, “.. आता समर्थकांच्या माध्यमातून लगेच डायलॉग पसरवू नका,"बुलाती है मगर जाने का नही'" त्यामुळे आधीच सांगते.. "बुलाती है और अगर सच मे आपमे हिम्मत है , और आप गलत नही है,तो जरूर आने का"






