Home > रिपोर्ट > कायद्यात मंत्री, श्रीमंत आणि मर्जीतल्यांसाठी वेगळा न्याय का?- तृप्ती देसाई

कायद्यात मंत्री, श्रीमंत आणि मर्जीतल्यांसाठी वेगळा न्याय का?- तृप्ती देसाई

कायद्यात मंत्री, श्रीमंत आणि मर्जीतल्यांसाठी वेगळा न्याय का?- तृप्ती देसाई
X

महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा सर्वांना समान न्याय मिळेल अशी आशा होती मात्र, आता सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आणि मंत्री श्रीमंतांसाठी वेगळा न्याय अशी बोचरी टीका भुमाता ब्रीगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महाविकासआघाडी सरकार वर केली आहे. ABP माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना खोट्या बातमीच्या आधारावर तातडीने अटक करण्यात आली होती या प्रकरणावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षा रक्षक, वाधवान कुटुंब, इंंदुरीकर महाराज अशा बहुचर्चित प्रकरणांचा दाखला देताना तृप्ती देसाई यांनी सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आणि मंत्री, श्रीमंतांसाठी आणि आपल्या मर्जीतील लोकांसाठी वेगळा न्याय अशी जणू काही व्याख्याच गृहमंत्रालयाच्या सध्याच्या कारवाईनुसार होत चालली आहे असं मत व्यक्त केलंय.

आमचा कायद्यावर विश्वास आहे परंतु ठराविक लोकांसाठी जर कायदा धाब्यावर बसवून नियम बनवले जात असतील तर भविष्यात जनतेचा कायद्यावरचा विश्वास नक्कीच कमी होऊ शकतो, जो आपल्या राज्यासाठी घातक ठरेल. अशी भीतीही त्यांनी यावेळी देसाई यांनी व्यक्त केली.

पाहुयात काय म्हटलं आहे तृप्ती देसाई यांनी,

जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल -परंतु अटक नाही

वाधवान कुटुंब गुन्हा दाखल -परंतु अटक नाही

इंदुरीकर प्रकरण-यूट्यूब वर वादग्रस्त व्हिडिओ, पुरावे उपलब्ध असूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही.

राहुल कुलकर्णी गुन्हा दाखल-तातडीने अटक

आपल्या देशात राज्यात लोकशाही आहे, कायदा आहे आणि तो कायदा सर्वांसाठी समान आहे.. परंतु कायदा जरी सर्वांसाठी समान असला तरी भेदभाव होताना दिसत आहे. सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आणि मंत्री, श्रीमंतांसाठी आणि आपल्या मर्जीतील लोकांसाठी वेगळा न्याय अशी जणू काही व्याख्याच गृहमंत्रालयाच्या सध्याच्या कारवाईनुसार होत चालली आहे.

महाविकास आघाडी सरकार आले आणि आता सर्वांनाच न्याय मिळेल ही अपेक्षा होती. परंतु गृहमंत्रालयाचे सचिवच लॉकडाउन उल्लंघन करून अतिश्रीमंत वाधवान कुटुंबियांना पास काय देतात, करमुसे प्रकरणात अश्लील पोस्ट टाकल्या म्हणून त्याला कायद्यानुसार अटक केली परंतु त्याला ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा जरी दाखल झाला असला तरी त्यांना मात्र अटक केलेली नाही. पण राहुल कुलकर्णी यांसारख्या पत्रकारांवर तातडीने गुन्हा दाखल होतो आणि अटकही होते... हा भेदभाव का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी जरूर जनतेला द्यावे.

आमचा कायद्यावर विश्वास आहे परंतु ठराविक लोकांसाठी जर कायदा धाब्यावर बसवून नियम बनवले जात असतील तर भविष्यात जनतेचा कायद्यावरचा विश्वास नक्कीच कमी होऊ शकतो,जो आपल्या राज्यासाठी घातक ठरेल

-सौ. तृप्ती देसाई ,संस्थापक अध्यक्षा भूमाता ब्रिगेड.

Updated : 17 April 2020 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top