Home > रिपोर्ट > वसतिगृह मुलींसाठी असुरक्षित...

वसतिगृह मुलींसाठी असुरक्षित...

वसतिगृह मुलींसाठी असुरक्षित...
X

राज्यात मुलींसाठी अनेक वसतिगृह आहे मात्र ही वसतिगृहच जर त्यांच्यासाठी असुरक्षित होत चालली तर मुलींनी करावं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच चंद्रपुरात राजुरा तालुक्यातील एका आदिवासी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे वसतीगृहातीलच दोन अधिकाऱ्यांनीच मुलींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी, संशयित अधिकाऱ्यांसह वसतीगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं ?

वसतिगृहातील दहा वर्षांच्या दोन मुलींच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीद्वारे मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबतची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पोलिसांनी शाळा अधीक्षक छबन पचारे आणि सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरुटकर या दोघांना अटक केली. या दोघांनाही 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच या गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी कल्पना ठाकरे आणि लता कनके या महिला कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर या वसतीगृहाची सरकारी मान्यता रद्द करण्यात आली आहे.

Updated : 17 April 2019 5:39 AM GMT
Next Story
Share it
Top