Home > रिपोर्ट > TikTok स्टार सोनाली फोगाट राजकारणात

TikTok स्टार सोनाली फोगाट राजकारणात

TikTok स्टार सोनाली फोगाट राजकारणात
X

सोशल मिडीयावर टिक टॉक व्हिडीओ अपलोड करून लोकांची वाहवा मिळवणाऱ्या व्यक्तींना आता राजकारणात उतरवायला सुरूवात झाली आहे.

(tik tok) टिक टॉक स्टार असलेल्या हरयाणातील (Sonali Phogat) सोनाली फोगाटला भाजपने विधानसभा निवडणूकीची उमेदवारी दिली आहे.

हरियाणामधील आदमपूर विधानसभा मतदार संघातून सोनाली फोगाट निवडणूक लढवणार आहे. भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर सोनाली सध्या प्रचारात व्यस्त आहे. सोनालीनं या आधी चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये काम केलं आहे. टिकटॉकवर तिचे १२२४ फॉलोअर्स आहेत. सोशल मिडीयावर तिचे व्हिडीओज् फार शेअर केले जातात. सोनालीची लोकप्रियता आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारा जनसंपर्क पाहता कॉंग्रेस पक्षाचे कुलदीप बिश्नोई यांच्यासमोर आता मोठं आव्हान आहे.

Updated : 5 Oct 2019 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top