Home > रिपोर्ट > मोदींच्या ‘या’ मोहिमेसाठी दिपीकाचं योगदान

मोदींच्या ‘या’ मोहिमेसाठी दिपीकाचं योगदान

मोदींच्या ‘या’ मोहिमेसाठी दिपीकाचं योगदान
X

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिवाळीच्या निमित्ताने देशवासियांना ‘सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ‘भारत की लक्ष्मी’ अभियान सुरू करण्याचं आवाहन केलं होतं.

यंदाच्या दिपोत्सवाच्या निमित्ताने ‘भारत की लक्ष्मी’ या उपक्रमासाठी दिपीकासह बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिनेदेखील योगदान दिलं आहे. हा व्हिडीओ खुद्द पंतप्रधानांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

एक स्त्री म्हणून मनात असणारी भीती आणि त्या भीतीवर मात करण्याची क्षमता, तसेच स्त्रीमध्ये असणारी जिद्द, आव्हानं पेलण्याची तिची तयारी. आत्मविश्वास अशा अनेक बाबी या व्हिडिओमार्फत दाखवण्यात आल्या आहेत.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची झलकही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

Updated : 23 Oct 2019 5:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top