Home > रिपोर्ट > इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

इंदापूरच्या पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात
X

राज्याच्या राजकारणातला पुढचा काळ नेत्यांची पुढची पिढी गाजवणार असं दिसतंय. कारण, अनेक प्रस्थापित नेत्यांची मुलं राजकारणात सक्रिय होत असलेली आपण पहिली आहेत. त्यात आता काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचं नाव जोडलं गेलंय. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिलाय.

अंकिता यांचं शिक्षण परदेशात झालेलं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या आई रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी काँग्रेसने अंकिता पाटील यांना संधी दिली आहे

Updated : 6 Jun 2019 6:08 AM GMT
Next Story
Share it
Top