Home > रिपोर्ट > रात्र असो की दिवस महिलांच्या सुरक्षेसाठी त्या नेहमीच ‘ऑन ड्युटी’

रात्र असो की दिवस महिलांच्या सुरक्षेसाठी त्या नेहमीच ‘ऑन ड्युटी’

रात्र असो की दिवस महिलांच्या सुरक्षेसाठी त्या नेहमीच ‘ऑन ड्युटी’
X

सुशिला हजारे या आहेत बिडमधली महिला पोलिस. या कवच कार्यक्रमांर्तगत रात्री पेट्रोलिंग करतांना दिसुन येताय. केवळ रात्री पोलिस म्हणुन त्या कार्यकरत असतांना आपल्या कामात कोठेही कमतरता रहात नाही ना हे बघतात. रात्री आपल्या दोन महिला सहकार्या सोबत त्या स्वतःजीप चालवतात. कुठल्याही महिलेला रात्री घरी जाण्यास अडचण असेल तर त्यांना माहिती होताच त्या महिलेला घरपोच करण्याची जबाबदारी त्या स्विकारतात. “आपल्याला या कामामुळे भिती वाटत नाही उलट महिलांना मदत तर करताच येते मात्र आपणही पुरुषांपेक्षा कमी नाही आत्मविश्वासही येतो” अस त्या विश्वासान सांगतात. सुरक्षेसाठी तत्पर असणा-या या महिला पोलिसांना मॅक्सवुमनचा सलाम.

Updated : 10 Dec 2019 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top