Home > रिपोर्ट > आजच्या हादरवणाऱ्या हेडलाइन्स – प्रियांका चतुर्वेदी

आजच्या हादरवणाऱ्या हेडलाइन्स – प्रियांका चतुर्वेदी

आजच्या हादरवणाऱ्या हेडलाइन्स – प्रियांका चतुर्वेदी
X

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज ही वर्तमानपत्रातल्या हादरवून टाकणाऱ्या हेडलाइन ट्वीट केल्या आहेत. महिलांच्या कपड्यांमुळे-वागण्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असं सर्रास बोलणाऱ्या समाजासाठी या हेडलाइन्स मोठी चपराक आहेत.

*आजच्या ठळक बातम्या –

- बुलढाण्यातील 55 वर्षाच्या दिव्यांग महिलेवर बलात्कार करून तिची हत्या

- दरभंग्यात पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार

- त्रिपुरा मध्ये 1 वर्षाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार, बलात्कारानंतर तरूणीला जिवंत जाळलं

- ‘ती’चं आधीच दहन झालंय, आम्ही आता तिला पुरणार आहोत. उन्नाव पिडीतेच्या वडिलांची प्रतिक्रीया

भारत आणि भारतातील महिलांसाठी आणखी एक सामान्य दिवस*

असं हे ट्वीट आहे. काल ही प्रियांका चतुर्वेदी यांनी अशाच महिला अत्याचारावरच्या ठळक बातम्या पोस्ट केल्या होत्या.

Updated : 8 Dec 2019 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top