Home > रिपोर्ट > डॉ. पायलने तक्रारचं केली नव्हती – नायर रुग्णालय

डॉ. पायलने तक्रारचं केली नव्हती – नायर रुग्णालय

डॉ. पायलने तक्रारचं केली नव्हती – नायर रुग्णालय
X

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी नायर रुग्णालयने स्थायी समितीकडे अहवाल दिला आहे. यात पायलचे रॅगिंग होत असल्याबद्दल तिने किंवा तिच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालय कार्यालय किंवा रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. तसेच तिच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी अधिष्ठात्यांची भेट घेतलेली नव्हती, असे नायर रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याबाबतचे लेखी स्पष्टीकरण रुग्णालयाने शुक्रवारी स्थायी समितीला सादर केले.

काय आहे रुग्णालयाच्या अहवालात?

डॉ. पायल तडवी रॅगिंगप्रकरणी रुग्णालयाने काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल स्थायी समितीने मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत रुग्णालयाकडून मागवला होता. त्यानुसार शुक्रवारच्या समितीच्या बैठकीत रुग्णालयाने लेखी अहवाल सादर केला.

डॉ. पायलच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध त्यानंतर स्वतंत्र योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, डॉ. स्नेहा शिरोडकर यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रुग्णालयाने या अहवालात दिली आहे.

डॉ. पायलला लाइट पोस्टिंग

डॉ. पायलने तिच्या आईच्या आजारपणाबद्दल लाइट पोस्टिंग देण्याची तोंडी विनंती डिसेंबर २०१८ मध्ये विभागप्रमुख डॉ. स्नेहा शिरोडकर यांच्याकडे केली होती. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला लाइट पोस्टिंग देण्यात आली होती, असे या अहवालात म्हटले आहे.

Updated : 8 Jun 2019 3:26 AM GMT
Next Story
Share it
Top