सुषमा स्वराजांचा सिक्सर; तर मी मिष्किल बोलणं बंद करेन
Max Woman | 3 April 2019 11:00 AM IST
X
X
माझ्या गरीब सासरच्यांना, सासू-सासऱ्यांना माझ्या व्हिसा मुळे लग्नसराई पुढे ढकलावी लागत आहे, मला माझ्याच लग्नाच्या रिसेप्शन ला हजर राहता येत नाहीय, त्यामुळे माझ्या व्हिसावर लवकर निर्णय घ्या अशा मागणीचं ट्वीट करणाऱ्या एका युवतीला सुषमा स्वराज यांनी ट्वीट वर ओह, मी तुझ्या सासरच्यांना भारतीय व्हिसा देण्यासाठी मदत करू शकते, जेणे करून त्यांना लग्नसमारंभ पुढे ढकलावा लागणार नाही असं उत्तर दिलं.
न्यूयॉर्क मधल्या युवतीने तिची व्यथा नेमक्या शब्दांत मांडलेली नसल्याने सुषमा स्वराज यांचा उत्तर देताना गोंधळ झाला होता. यावर एका ने सुषमा स्वराज यांना ट्वीट करत, ‘तुम्ही राहुल गांधींपेक्षा जास्त मिष्कील आहात’ असं म्हटलं. यावर मात्र सुषमा स्वराज यांनी तात्काळ उत्तर देत, ‘तर मी मिष्कील बोलणंच बंद करेन,’ असं उत्तर दिलं.
Updated : 3 April 2019 11:00 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire