Home > रिपोर्ट > जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखेंनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखेंनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखेंनी राजीनामा द्यावा - काँग्रेस
X

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी राजीनामा देण्यासाठी काँग्रेस पक्षात मागणी होऊ लागली आहे. त्या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत, आणि आता त्या भाजपवासी झाल्या असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. विखे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी ओहोळ यांनी केली. नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शालिनी विखे राहाता तालुक्यातून काँग्रेसची उमेदवारी करत विजयी झाल्या. त्यामुळे त्यांना काँग्रेसने अध्यक्षपदाची संधी दिली. आता विखे परिवार काँग्रेससोबत नसल्याने शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ओहोळ यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Updated : 21 Jun 2019 11:13 AM IST
Next Story
Share it
Top