यशोमती ठाकूर यांच्या तत्परतेने एका जखमीला मिळाले जीवदान
Max Woman | 15 Sept 2019 7:53 PM IST
X
X
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर ( Mla Yashomati Thakur) यांनी बारोळा फाट्यावर झालेल्या अपघात ग्रस्ताला मदत करून, माणूसकीचा परिचय करून दिला आहे.
मोर्शी तालुक्यातील भूमिपूजनाचा कार्यक्रमावरून आमदार यशोमती ठाकूर ह्या परतीच्या प्रवासात असताना त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास वाटेत अपघात झाल्याचं आढळलं. या अपघातात अमोल बोंडे (Amol Bonde) व राकेश भिसने (Rakesh Bhisane) हे गंभीर जखमी अवस्थेत होते. यशोमती ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना तत्काळ मदतीचा हात दिला. या अपघातात अमोल बोंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर राकेश भिनसे यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
Updated : 15 Sept 2019 7:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire