Home > रिपोर्ट > महिला हिंसाचार विरोधी पंधरवाडा

महिला हिंसाचार विरोधी पंधरवाडा

महिला हिंसाचार विरोधी पंधरवाडा
X

25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा महिला हिंसाचार विरोधी पंधरवाडा म्हणून पाळला जातो. रिपब्लिक डॉमनिक या देशाच्या अध्यक्ष राफेल ट्रूझेलो याच्या विरुद्ध मिराबेल भगिनींनी आवाज उठविला होता. त्याच्या अराजकीय कारभाराबद्दल लिखाण करत होत्या. यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती. तो दिवस 25 नोव्हेंबर १९३० असा होता. मिराबेल भगिनीनी आंदोलन केली होती. त्यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि पाठिंबा यामुळे राफेल ट्रूझेलोची अडचण होत होती. अशा कारणामुळे मिराबेल सिस्टर्सची हत्या करण्यात आली होती. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले होते. यातून पुढे संयुक्त राष्ट्रसंघाने २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा पंधरवाडा महिला हिंसाचार विरोधी पंढरवाडा म्हणून पाळला जातो. असे असले तरी महिला हिंसाचाराचा आलेख जागतिक स्तरावरील कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येतो.

जागतिक स्तरावर स्त्री हिंसाचाराची आकडेवारी वाढती आहे. दर तीन स्त्रियापैकी एक स्त्री तिच्या जोडीदारकडून शारीरिक, लैंगिक हिंसेची बळी पडते. 70% स्त्रिया त्यांच्या जीवनात एकदा तरी शारीरिक, लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. 750 दशलक्ष मुली या बाल विवाहाच्या बंधनात अडकवल्या जातात. 15 ते 49 वयोगटातील तीस देशातील 200 दशलक्ष स्त्रिया ह्या Female Genital Cutting या अमानवी प्रथेच्या बळी आहेत. 11 ते 15 वयोगटातील तीन पैकी एक मुलगी ही भीती दाखवून किंवा धमकी देऊन तिचे शोषण केले जाते. भारतातील एनसीआरबीने २०१७ चा अहवाल प्रसिद्ध केला आहे यानुसार २०१५ च्या तुलनेत २०१७ मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. यात नोंद झाल्यानुसार २७% स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना नोंद झाल्या आहेत. २०.५% स्त्रिया / मुलींच्या अपहरणची नोंद झाली आहे. तर ७.० % बलात्काराच्या घटना नोंद झाल्या आहेत. समस्या खूप आहेत. प्रश्न खूप आहेत. वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे अजून मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल...

रेणुका कड

Updated : 26 Nov 2019 12:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top